अहवाल आल्याशिवाय कारवाई नाही
By admin | Published: December 8, 2014 01:44 AM2014-12-08T01:44:30+5:302014-12-08T01:44:30+5:30
कार्बन उत्सर्जनात भारत तिस-या क्रमांकावरील देश असून, भारताने आपल्या उत्सर्जनात कशी कपात करणार याचा कालावधी स्पष्ट करावा असे आवाहन संयुक्त राष्ट्राने केले आहे
लीमा : कार्बन उत्सर्जनात भारत तिस-या क्रमांकावरील देश असून, भारताने आपल्या उत्सर्जनात कशी कपात करणार याचा कालावधी स्पष्ट करावा असे आवाहन संयुक्त राष्ट्राने केले आहे. त्यावर भारताचे उत्सर्जन किती आहे याचा अहवाल आयएनडीसी ही संस्था तयार करत असून तिचे निष्कर्ष आल्याखेरीज भारत कोणतीही कारवाई करणार नाही, हा भारताच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे असे भारतीय प्रतिनिधीनी सांगितले. युनोतर्फे हवामान बदलावर आयोजित करण्यात आलेले हे अधिवेशन दोन आठवडे चालणार असून आता पहिला आठवडा संपला आहे.
विविध देशांच्या आयएनडीसीचे मुद्दे सोडविणे हा अधिवेशनातील एक प्रमुख मुद्दा आहे.
भारताने बांधिलकी जाहीर करावी
हवामानातील घातक बदल रोखण्यासाठी भारताने हवेत कमीत कमी वायू सोडले जातील यासाठी जूनपर्यंत निश्चित अशी बांधिलकी जाहीर करावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी केले. (वृत्तसंस्था)