जमात उद दवावर बंदी नाही -पाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2015 04:26 AM2015-07-09T04:26:25+5:302015-07-09T04:26:25+5:30
पाकिस्तानने कुख्यात दहशतवादी हफीज सईद याच्या जमात उद दवा या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली.
इस्लामाबाद : पाकिस्तानने कुख्यात दहशतवादी हफीज सईद याच्या जमात उद दवा या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली असून, बंदी घातलेली लष्कर ए तोयबा ही संघटना व जमात उद दवा यांच्यात काही संबंध असल्याचे पुरावे नाहीत असे म्हटले आहे.
पाकिस्तानचे राज्यमंत्री व निवृत्त जनरल अब्दुल कादीर बलोच यांनी पाकिस्तानची ही भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत लष्कर ए तोयबाचेच नवे नाव जमात उद दवा असल्याचा ठराव करण्यात आला आहे; पण जमात उद दवा व लष्कर ए तोयबा यांच्यात संबंध असल्याचे पुरावे नाहीत असे बलोच यांनी म्हटल्याचे वृत्त डॉन वृत्तवाहिनीने दिले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांच्या वतीने ते पाक सिनेटमध्ये बोलत होते. (वृत्तसंस्था)