वयाच्या २१ वर्षांपर्यंत ‘नो सिगारेट’

By admin | Published: May 20, 2014 12:15 AM2014-05-20T00:15:34+5:302014-05-20T00:15:34+5:30

लोकांमध्ये आरोग्य विषयक जाणीव वाढावी या उद्देशाने न्यूयॉर्क प्रशासनाने एक क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. यानुसार २१ हून कमी वय असलेल्या तरुण-तरुणींना रविवारपासून सिगारेट खरेदी बंदी घालण्यात आली आहे.

'No cigarette' for 21 years of age | वयाच्या २१ वर्षांपर्यंत ‘नो सिगारेट’

वयाच्या २१ वर्षांपर्यंत ‘नो सिगारेट’

Next

न्यूयॉर्क : लोकांमध्ये आरोग्य विषयक जाणीव वाढावी या उद्देशाने न्यूयॉर्क प्रशासनाने एक क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. यानुसार २१ हून कमी वय असलेल्या तरुण-तरुणींना रविवारपासून सिगारेट खरेदी बंदी घालण्यात आली आहे. माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग यांनी आपल्या दुसर्‍या कार्यकाळाच्या अखेरीस १९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातल्या कायद्यावर स्वाक्षरी केली होती. हा कायदा सहा महिन्यांनी अमलात आला आहे. यानुसार सिगारेट खरेदीचे किमान वय १८ वरून २१ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे १८-२० या वयोगटातील सिगारेट सेवन करणार्‍यांची संख्या निम्मी होईल, अशी आशा न्यूयॉर्क प्रशासनाला आहे. शेजारच्या छोटी इटली म्हणून ओळखल्या जाणार्‍या नोलिटा येथे वृत्तपत्र, सिगारेट, कँडी, कॉफी आणि केक विक्री दुकानांच्या प्रवेशद्वारावर ‘२१ वर्षांखालील तरुण-तरुणींना सिगारेट निषेध,’ असा इशारा लिहिलेला दिसून येतो. उल्लेखनीय म्हणजे, सिगारेट विकत घेतेवेळी वयाचा पुरावा म्हणून वैध ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे. असा पुरावा सोबत नसल्यास सिगारेट विकत घेता येत नाही. आणि दुकानदारही कुणालाही सिगारेट विकण्यापूर्वी संबंधितांचे ओळखपत्र तपासून पाहतात. शहरातील नागरिकांकडूनही प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर बोलताना एक २३ वर्षीय तरुणी म्हणाली, खूप चांगली बाब आहे. आता मुले शाळेपासूनच सिगारेट ओढण्यास सुरुवात करणार नाहीत. न्यूयॉर्क प्रशासनाचा हा कायदा तंबाखूजन्य अन्य पदार्थांसाठीही लागू आहे. शहरात सिगारेट ओढणार्‍यांच्या संख्येत घट करण्याच्या उद्देशाने शहर प्रशासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. २९ एप्रिलपासून रेस्टॉरंट, बार, उद्याने यासारख्या शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच सागर किनार्‍यावर सिगारेट ओढण्यास बंदी आहे. काही खासगी निवासी वस्त्यांमध्येही ही बंदी लागू आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 'No cigarette' for 21 years of age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.