सात मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एन्ट्री

By admin | Published: January 28, 2017 10:39 AM2017-01-28T10:39:21+5:302017-01-28T10:56:35+5:30

सात मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एन्ट्री लागू करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा फतवा काढला आहे.

No entry in the United States of 7 Muslims | सात मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एन्ट्री

सात मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एन्ट्री

Next

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 28 -   सात मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेमध्ये नो एन्टी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा फतवा काढला आहे. शुक्रवारी या संबंधीचा एक नवा आदेश जारी करण्यात आला असून याद्वारे 7 मुस्लिम देशांतील निर्वासितांनी अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. 
(ट्रम्प यांच्या शपथविधीचे गिगापिक्सेल छायाचित्र)
 
कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांपासून अमेरिकेचा बचाव करण्यास हा निर्णय घेण्यात आला आहे. सीरिया, इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या सात देशांचा यात समावेश आहे. 'कट्टर इस्लामिक दहशतवाद्यांना अमेरिकेबाहेर ठेवण्यासाठी हा उपाय असून,  केवळ अमेरिकेला पाठिंबा देणा-या, अमेरिकेवर प्रेम करणा-यांचाच स्वीकार करू', असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ते पेंटागॉन येते बोलत होते. 
(मेक्सिको-अमेरिकेतील वाद शिगेला, ट्रम्प यांचा मेक्सिकोला इशारा)
 
राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर पेंटागॉन दौ-यावर असलेल्या ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली. 
'देशात त्या समस्यांना येऊ देणार नाही, ज्याविरोधात आपले सैनिक परदेशात लढत आहेत', असेही यावेळी ट्रम्प म्हणाले.  
 
दरम्यान, या निर्णयामुळे किमान 4 महिने तरी या सात देशांतील निर्वासितांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. कारण पुनर्वसन कार्यक्रमाला 120 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय, 90 दिवसांपर्यंत व्हिसाही दिला जाणार नाही.
 
 
 

 

Web Title: No entry in the United States of 7 Muslims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.