१ जानेवारीपासून नवीन शुल्क नाही; अमेरिका व चीन यांच्यात झाली सहमती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:48 AM2018-12-03T04:48:27+5:302018-12-03T04:48:35+5:30
१ जानेवारीपासून नवे शुल्क आकारण्यात येणार नाहीत, यावर अमेरिका व चीन यांनी सहमती दर्शविली आहे.
ब्यूनस आयर्स : १ जानेवारीपासून नवे शुल्क आकारण्यात येणार नाहीत, यावर अमेरिका व चीन यांनी सहमती दर्शविली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे समकक्ष शी जिनपिंग यांच्यात ही सहमती झाली आहे. अमेरिका चीनवर २०० अब्ज डॉलरचे नवे शुल्क आकारण्याच्या विचारात असताना ही सहमती झाली आहे. ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार लॅरी कुडलो यांनी ही बैठक सकारात्मक झाल्याचे म्हटले. या नेत्यांमधील सहमतीमुळे उभय देशातील संघर्ष रोखण्यास मदत होणार आहे. अमेरिका १ जानेवारीपासून चीनी वस्तूंवर २५ टक्के शुल्क आकारणार होता. मात्र, नव्या सहमतीमुळे नवे दर अंमलात येणार नाहीत. ट्रम्प म्हणाले की, अमेरिका व चीन दोघांसाठीही अमर्याद संधी यामुळे निर्माण झाल्या आहेत.