Pakistan Imran Khan : "भारताविरोधात बोलण्याची कोणत्याही महासत्तेची हिंमत नाही;" इम्रान खान यांच्याकडून स्तुती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 11:32 PM2022-04-08T23:32:51+5:302022-04-08T23:33:53+5:30
Pakistan Imran Khan : आजपर्यंत पाकिस्तानचा कोणताही पंतप्रधान ना पाच वर्ष सत्तेत राहू शकलाय ना मानानं खुर्ची सोडू शकलाय, इम्रान खान यांचं वक्तव्य.
Pakistan Imran Khan : अविश्वास प्रस्तावाच्या काही तास आधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी देशाला संबोधित केले. "२६ वर्षांपूर्वी जेव्हा मी माझा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ सुरू केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मी निराश झालो आहे, पण मी निर्णयाचा आदर करतो. मी एकदाच तुरुंगात गेलो आहे, जोपर्यंत देशाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी न्यायाची चर्चा करेन," असा विश्वास आहे. यावेळी इम्रान खान यांनी भारताचे कौतुकही केले. तसेच भारत हा स्वाभिमानी देश असल्याचे सांगितले.
"सर्वोच्च न्यायालयाने कागदपत्रे मागवून ती पाहिली असती, यामुळे निराशा झाली. या ठिकाणी खुलेआम घोडेबाजार सुरू आहे. शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे त्यांना हॉटेलमध्ये बंद केले जात आहे. कोणत्या ठिकाणी याची परवानगी मिळते. पाकिस्तानच्या लोकशाहीची उघडपणे चेष्टा बनली आहे," असेही इम्रान खान म्हणाले.
तरुणांना काय दाखवतोय?
"देशाची ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. अशा राष्ट्राच्या तरुणांना आम्ही वाचवणार नाही आणि तुमच्याकडे नेते लाच घेऊन सरकार पाडतायत हे दाखवतोय. आपण त्यांना काय दाखवत आहोत? पाकिस्तानचे लोकप्रतिनिधी आपला स्वाभिमान विकत आहेत आणि आरक्षित जागाही उघडपणे विकल्या जात आहे. मी पाकिस्तान म्हणून बोलत आहे. या देशाला मोठा देश बनवण्याचं स्वप्न मी पाहत होतो. हे जे सुरू आहे ते स्ट्रगल आहे. जे सुरू आहे त्यानं या स्वप्नाला धक्का लागत आहे," असंही ते म्हणाले.
... तर माफ केलं जाईल
आम्ही सायफर प्रकाशित केल्यास आमची गुप्त माहिती जगाला कळेल, असे इम्रान खान यांनीन सांगितले. अमेरिकेत पाकिस्तानी राजूदातानं अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यांनी इम्रान खान यांनी रशियाला जायला नव्हतं पाहिजे. इम्रान खान अविश्वास प्रस्तावापासून वाचले तर पाकिस्तानला समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु ते जर हरले तर पाकिस्तानला माफ केलं जाईल, असंही इम्रान खान यांनी सांगितलं.
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी आपल्या देशातील लोकांना भेटत असल्याचे इम्रान म्हणाले. "आमच्या लोकांनी मला सांगितलं की अमेरिकेनं आम्हाला बोलावलं आणि अविश्वास प्रस्ताव येणार असल्याचं सांगितलं. ही पूर्ण स्क्रिप्ट सुरू होती," असंही त्यांनी नमूद केलं.
ना बँक खातं ना प्रॉपर्टी
माझा सर्वात मोठा गुन्हा म्हणजे मी ड्रोन हल्ल्यांना विरोध केला. त्यांना माहीत आहे की इम्रान खान यांचे ना कोणते बँक खाते आहे ना बाहेर कोणती मालमत्ता आहे. हे सर्व नाटक मला हटवण्यासाठी आहे. विरोधी पक्ष देशासाठी प्रत्येक त्याग करण्यास तयार आहे. अमेरिका नाराज होऊ नये असे विरोधकांना वाटत होते म्हणून ते हे करत आहेत, रशियाप्रमाणे आपली मालमत्ता जप्त होऊ नये, अशी भीती त्यांना वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
भारत स्वाभिमानी देश
इम्रान खान यांनी भारताचे कौतुक करत भारत हा स्वाभिमानी देश असल्याचे म्हटले आहे. "भारताचे परराष्ट्र धोरण हे स्वतंत्र आहे. कोणत्याही महासत्तेची भारताविरोधात बोलण्याची हिंमत नाही. भारत रशियाकडून इंधन विकत घेत आहे, परंतु त्यांना कोणी काही बोलू शकत नाही. आपल्या २२ कोटी लोकांसाठी जे शक्य आहे ते मी करणार. मी माझ्या जनतेला अन्य कोणत्याही देशाचा हुकूम मानू देणार नाही. जो पर्यंत आपलं परराष्ट्र धोरण लोकांच्या भल्यासाठी नसेल तोपर्यंत त्याचा काही अर्थ नाही," असंही इम्रान खान यांनी स्पष्ट केलं.