शांततेचा नोबेल पुरस्कार नॉव्रेत का?

By admin | Published: December 11, 2014 12:11 AM2014-12-11T00:11:13+5:302014-12-11T00:11:13+5:30

नोबेलचे शांतता पुरस्कार नॉव्रेची राजधानी ओस्लोमध्ये दिला जातो. बाकीचे नोबेल पुरस्कार स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे दिले जातात, पण शांतता पुरस्कार मात्र नॉव्रेत दिला जातो.

Nobel laureate of Nobel? | शांततेचा नोबेल पुरस्कार नॉव्रेत का?

शांततेचा नोबेल पुरस्कार नॉव्रेत का?

Next
स्टॉकहोम : नोबेलचे शांतता पुरस्कार नॉव्रेची राजधानी ओस्लोमध्ये दिला जातो. बाकीचे नोबेल पुरस्कार स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे  दिले जातात, पण शांतता पुरस्कार मात्र नॉव्रेत दिला जातो. 19क्1 पासून जेव्हा नोबेल पुरस्कार दिले जाऊ लागले तेव्हा या पुरस्काराचे प्रमुख संस्थापक आल्फेड नोबेल यांच्या इच्छेनुसार शांततेचा नोबेल पुरस्कार नॉव्रेच्या संसदेतील पाच सदस्यांच्या समितीद्वारे दिला जातो. आल्फ्रेड नोबेल यांनी या रहस्यावरील गूढ कधीही उलगडले नाही. नोबेल यांना नॉव्रेचे आघाडीचे देशभक्त लेखक बोर्न्‍सत्जेने बोर्नसन यांनी हा पुरस्कार द्यावा अशी शिफारस केली होती, असा एक तर्क आहे, तर आंतरराष्ट्रीय शांतता आंदोलनाच्या समर्थनार्थ जगात सर्व प्रथम नॉव्रेच्या संसदेने मतदान केले होते, असेही सांगितले जाते. नोबेल यांनी स्वीडन व नॉव्रे यांच्यात नोबेल पुरस्काराचे विभाजन केले. कारण शांततेच्या पुरस्काराला राजकीय रंग मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन या पुरस्काराला राजकारणातील शस्त्रचे स्वरूप मिळू नये म्हणून या पुरस्काराची जबाबदारी नॉव्रेला देण्यात आली. (वृत्तसंस्था)
 
नोबेल यांचे मृत्युपत्र 
4नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रत अशी नोंद केली आहे की, शांततेचा नोबेल पुरस्कार देताना उमेदवारांची राष्ट्रीयता लक्षात घेऊ नये. सुयोग्य उमेदवाराला हा पुरस्कार दिला जावा. उमेदवार स्कँडिनेवियन नसला तरीही त्याला पुरस्कार दिला जावा.
 
42क् व्या शतकात मूळ स्कँडिनेवियन असणा:या 8 लोकांना हा पुरस्कार मिळाला. त्यात स्वीडनचे पाच, नॉव्रेचे 2 व डेन्मार्कची एक व्यक्ती आहे. 

 

Web Title: Nobel laureate of Nobel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.