रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर
By admin | Published: October 8, 2015 04:47 AM2015-10-08T04:47:47+5:302015-10-08T04:47:47+5:30
हानी झालेल्या डीएनएला पेशी कशा दुरुस्त करतात यावरील संशोधनासाठी टॉमस लिंडहल् , पॉल मॉडरिच आणि अझीज सँकर यांना रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार बुधवारी
स्टॉकहोम : हानी झालेल्या डीएनएला पेशी कशा दुरुस्त करतात यावरील संशोधनासाठी टॉमस लिंडहल् , पॉल मॉडरिच आणि अझीज सँकर यांना रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार बुधवारी जाहीर झाला. आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या आणि वय वाढण्यास हातभार लावणाऱ्या डीएनएतील बदलांना शरीर कसे दुरुस्त करते हे या तिघांनी उघड करून वैद्यकशास्त्रात चकित करणारी आघाडी खुली केली आहे.
टॉमस लिंडहल् हे स्वीडनचे, मॉडरिच हे अमेरिकेचे, तर सँकर तुर्कीश-अमेरिकन आहेत. जेव्हा पेशी विभागल्या जातात तेव्हा सूक्ष्म यंत्रणा अतिशय व्यवस्थितरीत्या संकेताची प्रतिकृती तयार करू पाहतात; परंतु त्यांच्या कामात घडलेल्या चुकीमुळे कन्या पेशींना (डॉटर सेल्स) मरावे लागते, अझीज सँकर यांनी पेशी हानी निश्चित करण्याच्या नीलातीत किरण उत्सर्जनाचा (अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन) वापर करून शोधून काढली. मॉडरिच यांनी गुंतागुंतीची डीएनए बदलाची प्रक्रिया मांडली.