अणु हल्ल्यातील लोकांच्या  चळवळीला शांततेचे नोबेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 09:43 AM2024-10-12T09:43:34+5:302024-10-12T09:43:34+5:30

अण्वस्त्रांविरोधात चळवळ करणाऱ्या या जपानी संस्थेला शांततेसाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

nobel peace prize to the people movement in nuclear attacks | अणु हल्ल्यातील लोकांच्या  चळवळीला शांततेचे नोबेल

अणु हल्ल्यातील लोकांच्या  चळवळीला शांततेचे नोबेल

स्टॉकहोम : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा, नागासाकी ही शहरे अणुबॉम्ब हल्ला करून बेचिराख केली होती. त्या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी निहोन हिडांक्यो ही संस्था स्थापन केली होती. अण्वस्त्रांविरोधात चळवळ करणाऱ्या या जपानी संस्थेला शांततेसाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

नोबेल समितीचे अध्यक्ष जॉर्गन वॅटने फ्रायडनेस यांनी सांगितले की, अण्वस्त्रांच्या वापराविरोधात निहोन हिडांक्यो ही संस्था उत्तम काम करत आहे. 

अणुबॉम्ब हल्ल्याच्या वेदनादायी आठवणी असूनही त्याने खचून न जाता या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपले काम अविरत सुरू ठेवले. शांततेसाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार निहोन हिंडाक्योला जाहीर झाल्याचे कळताच त्या संघटनेचे अध्यक्ष टोमोयुकी मिमाकी यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. 


 

Web Title: nobel peace prize to the people movement in nuclear attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.