ट्युनिशियन संस्थांना शांततेचे नोबेल जाहीर
By admin | Published: October 10, 2015 05:39 AM2015-10-10T05:39:10+5:302015-10-10T05:39:10+5:30
ट्युनिशियात लोकशाही स्थापण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या चार संस्थांना यंदाचे शांततेसाठीचा नोबेल पारितोषिक शुक्रवारी जाहीर झाले. २०११ मधील क्रांतीचा परिणाम
ओस्लो : ट्युनिशियात लोकशाही स्थापण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या चार संस्थांना यंदाचे शांततेसाठीचा नोबेल पारितोषिक शुक्रवारी जाहीर झाले. २०११ मधील क्रांतीचा परिणाम म्हणून अरब जगतात लोकशाहीसाठी अहिंसक व हिंसक आंदोलने सुरू झाल्यानंतर ट्युनिशियामध्येही हे आंदोलन पोहोचले होते.
नोबेल पुरस्कार या चार संस्थांनी ट्युनिशियामध्ये २०११ मधील जस्मीन क्रांतीनंतर अनेकांना सामावून घेणाऱ्या लोकशाहीच्या स्थापनेसाठी केलेल्या निर्णायक कामगिरीसाठी देण्यात आला आहे. द ट्युनिशियन जनरल लेबर युनियन, द ट्युनिशियन कॉन्फेडरेशन आॅफ इंडस्ट्री, ट्रेड अँड हँडिक्राफ्टस्, द ट्युनिशियन ह्युमन राईटस् लीग आणि द ट्युनिशियन आॅर्डर आॅफ लॉयर्स या नोबेल पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या चार संस्था आहेत. उत्तर आफ्रिकेतील ट्युनिशिया देशात या चार संस्थांनी ट्युनिशियन समाजात कामाची संस्कृती, कल्याण, कायदा आणि मानवी हक्कांची तत्त्वे यासह मूल्यांची जपणूक केली. या आधारावर या चार संस्थांनी मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली व ट्युनिशियामध्ये मोठ्या नैतिक भूमिकेतून शांततामय मार्गाने लोकशाही विकसित होण्यासाठी प्रेरक शक्तीचे काम केले, असे समितीने म्हटले आहे.