ट्युनिशियाच्या नॅशनल डायलॉग क्वार्टेटला शांततेचे नोबेल जाहीर
By admin | Published: October 9, 2015 03:35 PM2015-10-09T15:35:51+5:302015-10-09T15:36:01+5:30
ट्युनिशियाच्या 'दि नॅशनल डायलॉग क्वार्टेट' या संस्थेला २०१५ सालचा 'नोबेल पीस प्राईज' जाहीर झाला.
Next
>ऑनलाइन लोकमत
ओस्लो, दि. ९ - मध्य पूर्वेतील देशांना हादरवणा-या जास्मीन रिव्होल्यूशनच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी काम केलेल्या ट्युनिशियाच्या 'दि नॅशनल डायलॉग क्वार्टेट' या संस्थेला २०१५ सालचा 'नोबेल पीस प्राईज' जाहीर झाला आहे.
'जास्मिन रिव्हॉल्यूशन'नंतर ट्युनिशियात झालेल्या राजकीय हत्या व अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर चार संघटनांचा समूह असलेल्या या संस्थेची २०१३ साली स्थापना करण्यात आली .