31 वर्षांचा तुरुंगवास, 154 चाबकाचे फटके; कोण आहेत नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 05:08 PM2023-10-06T17:08:21+5:302023-10-06T17:09:33+5:30

Narges Mohammadi Wins Nobel Peace Prize: इराणमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

NobelPeacePrize Narges Mohammadi, Know Who is Nobel Peace Prize winner Nargis Mohammadi? | 31 वर्षांचा तुरुंगवास, 154 चाबकाचे फटके; कोण आहेत नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मदी?

31 वर्षांचा तुरुंगवास, 154 चाबकाचे फटके; कोण आहेत नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मदी?

googlenewsNext

Narges Mohammadi Wins Nobel Peace Prize:इराणमध्येमहिलांवरील अत्याचाराविरोधात लढणाऱ्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नर्गिस यांना महिलांच्या हक्कांसाठी लढल्याने, सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे आतापर्यंत 13 वेळा अटक झाली असून, 31 वर्षे तुरुंगवास आणि 154 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा झाली आहे. सध्या त्या तुरुंगात आहेत.

51 वर्षीय नर्गिस तुरुंगात 
महिलांचे स्वातंत्र्य आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या नर्गिस यांनी व्हाइट टॉर्चर नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे. तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांच्या व्यथा पुस्तकात नोंदवल्या. कैद्यांच्या अनुभवांचे दस्तऐवजीकरण आणि महिलांचा आवाज उठवणाऱ्या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना 2022 मध्ये रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

फाशीची शिक्षा रद्द करण्याची वकिली 
महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासोबतच नर्गिस फाशीची शिक्षा रद्द करणे आणि कैद्यांच्या हक्कांसाठीही आवाज उठवत आहेत. मानवाधिकारांशी संबंधित या कामांमुळे नर्गिस इराण सरकारच्या डोळ्यात आल्या, परिणामी त्यांना अनेकवेळा तुरुंगात जावे लागले.

महिलांच्या 33 वर्षांच्या संघर्षाचा प्रवास
भौतिकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या नर्गिस यांनी सुरुवातीला अभियंता म्हणून आपले करिअर सुरू केले. त्यानंतर त्यांनी वर्तमानपत्रांसाठी लेखन सुरू केले. हळुहळू त्या महिलांच्या हक्कांसाठी लिहू लागल्या आणि सरकारला प्रश्न विचारू लागल्या. याची सुरुवात 1990 पासून झाली. त्यांना 2011 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. पण त्या थांबल्या आणि घाबरल्या नाही.

त्यांना रोखण्यात इराण सरकार अपयशी ठरल्यावर सरकारने नर्गिस यांच्यावर अनेक आरोप केले. सरकारने त्यांच्यावर कैद्यांच्या कुटुंबीयांना मदत केल्याचा आरोप केला. यासाठी त्यांना 2011 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. 2 वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्यांना जामीन मिळाला आणि 2015 मध्ये त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले.

8 वर्षांपासून मुलांना पाहिले नाही
नर्गिस यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्या 8 वर्षांपासून आपल्या मुलींना भेटलेल्या नाहीत. नर्गिस यांना अली आणि कियाना ही जुळी मुले आहेत. नर्गिस यांची मुलं पती तागी रहमानीसोबत फ्रान्समध्ये राहतात.

Web Title: NobelPeacePrize Narges Mohammadi, Know Who is Nobel Peace Prize winner Nargis Mohammadi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.