मोदियानो यांना साहित्याचे नोबेल

By admin | Published: October 10, 2014 05:59 AM2014-10-10T05:59:09+5:302014-10-10T05:59:09+5:30

दुस-या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नाझी राजवटीने फ्रान्सवर मिळविलेला कब्जा व त्याचे देशावर झालेले परिणाम याचा आयुष्यभर अभ्यास करणारे फ्रेंच साहित्यिक पॅट्रिक मोदियानो

Nobody of Moduleiano's literature | मोदियानो यांना साहित्याचे नोबेल

मोदियानो यांना साहित्याचे नोबेल

Next

स्टॉकहोम : दुस-या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नाझी राजवटीने फ्रान्सवर मिळविलेला कब्जा व त्याचे देशावर झालेले परिणाम याचा आयुष्यभर अभ्यास करणारे फ्रेंच साहित्यिक पॅट्रिक मोदियानो याना यावर्षीचे साहित्याचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.हा पुरस्कार ८० लाख क्रोनरचा (११लाख अमेरिकन डॉलर) इतका आहे. नोबेल पुरस्काराने सन्मानित होणारे मोदियानो हे १५ वे फ्रेंच साहित्यिक आहेत
मोदियानो यांची स्मरणशक्ती व त्याच्या सहाय्याने त्यानी दैव वा नशिबाच्या मानवी जीवनावरील प्रभावाची केलेली उकल आणि आक्रमित झालेल्या देशातील जीवनाचे केलेले वर्णन केवळ अभूतपूर्व असून त्यासाठी त्याना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार जाहीर करणाऱ्या स्वीडीश अकादमीने म्हटले आहे. फ्रेंच भाषेत ४५हून अधिक दर्जेदार साहित्यकृती नावावर असलेले मोदियानी फ्रान्समध्ये सर्वश्रृत असले तरी त्यांच्या साहित्याचे इंग्रजीत
फारच कमी भाषांतर झाल्याने ते
इंग्रजी जाणणाऱ्या विवाला तेवढेचे परिचित नाहीत.
मोदियानो (६९) यांच्या मिसिंग पर्सन या कादंबरीला १९७८ चा प्रिक्स गॉनकर्ट हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता. त्यांचा जन्म १९४७ साली म्हणजेच दुसरे महायुद्ध संपल्यानंतर दोन वर्षानी पॅरिसच्या पश्चिम भागात झाला. त्यांचे वडील इटलीतील ज्यू होते व आई बेल्जियन अभिनेत्री होती. पॅरिस जर्मनीच्या ताब्यात असताना या दोघांचे प्रेम जमले होते. ज्यू नागरिकत्व , नाझी हल्ला व स्वत:ची ओळख नष्ट होणे या तीन मुद्यावर त्यांचे लिखाण बेतलेले असते. त्यात त्यांची १९६८ ची ला प्लेस दी , एटॉईल ही कादंबरीही आहे. जर्मनीच्या होलोकॉस्ट काळातील अत्याचारांच्या या कादंबरीचे जर्मनीतही स्वागत झाले आहे. मोदियानो यांच्या लिखाणाला पहिली ओळख मिळण्यास त्यांच्या आईचे परिचित फ्रेंच लेखक रेमंड क्यूनेऊ यांची मदत झाली असे मोदीयानो मानतात. मोदियानो वयाच्या विशीत असताना रेमंड यांनीच त्याना गलीमार्द पब्लिशिंग हाऊसमध्ये नेले होते. मोदीयानो यांनी फ्रेंच भाषेत ४० पुस्तके लिहीली असून, त्यातील काही इंग्रजीत भाषांतरीत झाली आहेत. रिंग आॅफ रोड (कादंबरी) व्हिला ट्रिस्ते , ए ट्रेस आॅफ मॅलिस , हनीमून ही त्यातील काही पुस्तके . त्यानी लहान मुलांसाठीही साहित्य लिहीले असून, लाकोम्बे ल्युईस या १९७४च्या चित्रपटाची कथाही लिहीली आहे. २००० साली ते कान्न चित्रपट महोत्सवाचे परीक्षक होते. काल, स्मृती व ओळख या तीन थीमवर मोदियानो यांचे साहित्य फिरते असे स्वीडीश अकादमीचे कायम सचिव पीटर इंग्लंड यांनी म्हटले आहे. त्यांची पुस्तके एकमेकाशी बोलतात व ते एकमेकांचे प्रतीध्वनी आहेत असेही त्यानी एसव्हीटी या स्वीडीश वाहिनीशी बोलतना सांगितले.
मोदीयानो पॅरिसमध्ये राहतात व क्वचितच मुलाखत देतात. (वृत्तसंस्था)

Web Title: Nobody of Moduleiano's literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.