...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, उत्तर कोरियाची अमेरिकेला थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 05:11 PM2020-06-11T17:11:56+5:302020-06-11T17:23:46+5:30
सियोलमधील आसन इंस्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या जेम्स किम यांनी म्हटले आहे, की उत्तर कोरिया निवडणुकीत बाधा आणण्यासाठी अथवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात समस्या निर्माण करण्यासाठी काय करेल, हे अद्याप स्पष्ट नाही.
सियोल : उत्तर कोरियाने गुरुवारी अमेरिकेला थेट धमकी दिली आहे. आंतर-कोरियन संबंधांवर भाष्य करण्याचा संयुक्त राज्य अमेरिकेला कसलाही अधिकार नाही. आगामी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक शांतते पार पडावी, यासाठी शांत राहणेच वॉशिंग्टनच्या हिताचे आहे, असे उत्तर कोरीयाने म्हटले आहे.
...तर अेरिकेला संकटांचा सामना करावा लागून शतो -
उत्तर कोरियाने हा धमी वजा इशारा अमेरिकेच्या राज्य विभागाच्या वक्तव्यानंतर दिला आहे. अमेरिकेच्या राज्य विभागाने म्हटले होते, की उत्तर कोरियाने मंगळवारी दक्षिण कोरियासोबतच्या संवादाची हॉट लाईन बंद केल्याने निराश आहोत. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयातील अमेरिकन संबंधांचे महासंचालक क्वोन (Kwon) जोंग गन यांनी राज्य वृत्त संस्था केसीएनएशी बोलताना म्हटले आहे, की 'आपल्या अंतर्गत प्रकरणांकडे लक्ष देण्या ऐवजी अमेरिका बेजबाबदारपणे भाष्य करत दुसऱ्याच्या प्रकरणांत लक्ष घालत असेल, तर त्याला संकटांचा सामना करावा लागून शतो.'
संधी ओळखण्याची हीच खरी वेळ; मोदींनी सांगितले, भारतीयांच्या मनातील 'जर'!
अमेरिकेने अंतर्गत प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे -
गन म्हणाले, जर काही वाईट अनुभवायचे नसेल तर, अमेरिकेने त्यांच्या तोंडाला लगाम लावायला हवा आणि आपल्या अंतर्गत प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे. हे केवळ अमेरिकेच्या हितासाठीच नव्हे, तर आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीही चांगले होईल.
सियोलमधील आसन इंस्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या जेम्स किम यांनी म्हटले आहे, की उत्तर कोरिया निवडणुकीत बाधा आणण्यासाठी अथवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात समस्या निर्माण करण्यासाठी काय करेल, हे अद्याप स्पष्ट नाही.
...अन् तेव्हापासून मुलं होणं बंद झालं, पोट धरून हसवणारी लालूप्रसादांची उत्तरं अन् किस्से
यामुळे उत्तर कोरियाने उचलले मोठे पाऊल -
सीमेवर उत्तर कोरियाविरोधात बदनामीकारक पत्रके वाटण्यापासून दक्षिण कोरियाने लोकांना रोखले नाही. यामुळए उत्तर कोरियाने दक्षीण कोरियासोबतचे सैन्य आणि राजकीय संबंध तोडले आहेत. किम जोंग उनने यांनी या घटनेची निंदा केली आहे.
तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबचलांब रांगा, एकाच दिवसांत जमले एवढे दान
राष्ट्रपती कार्यालयातील हॉट लाईनही बंद -
यावर पावले उचलत उत्तर कोरियाने मंगळवारपासून दोन्ही देशांदरम्यानच्या संपर्क कार्यालयातील संवाद लाईन आणि राष्ट्रपती कार्यालयातील हॉट लाईनदेखील बंद केली आहे.
दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही