उत्तर कोरियाने पुन्हा केली अणूचाचणी
By admin | Published: September 9, 2016 12:20 PM2016-09-09T12:20:07+5:302016-09-09T12:20:07+5:30
उत्तर कोरियाने पाचव्यांदा अणूचाचणी केली असल्याची शंका दक्षिण कोरियाने व्यक्त केली
Next
-ऑनलाइन लोकमत
सोल, दि.9- उत्तर कोरियाने पाचव्यांदा अणूचाचणी केली असल्याची शंका दक्षिण कोरियाने व्यक्त केली आहे. उत्तर कोरियाला भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाल्यानंतर दक्षिण कोरियाने ही शंका व्यक्त केली आहे.
अमेरिका, यूरोप आणि चीनच्या भूकंपाची माहिती ठेवणा-या यंत्रणांनी उत्तर कोरियाला भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती दिली आहे. अणू चाचणी केल्यामुळेच भूकंपाचे धक्के बसले असल्याचं सांगितलं जात आहे.
उत्तर कोरियाने 2006 मध्ये पहिल्यांदा अणूचाचणी केली होती, त्यानंतर संयुक्त राष्ट्राने 5 वेळेस त्यांच्यावर निर्बंध आणले होते. तरीही सर्व निर्बंध झुगारून उत्तर कोरियाने यावर्षी अनेक मिसाईलचे परिक्षणही केले होते.