...तर उत्तर कोरियातील नागरिकांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा! हुकूमशहा किम जोंगची सटकली, काढला नवा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 12:35 PM2021-06-07T12:35:21+5:302021-06-07T12:39:52+5:30

तरुणांमध्ये परदेशी भाषणे, हेअर स्‍टाइल आणि कपड्यांचा प्रसार रोखण्याची किमची इच्छा आहे.

North korea kim jong un is waging war on slang jeans and foreign films | ...तर उत्तर कोरियातील नागरिकांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा! हुकूमशहा किम जोंगची सटकली, काढला नवा आदेश

...तर उत्तर कोरियातील नागरिकांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा! हुकूमशहा किम जोंगची सटकली, काढला नवा आदेश

googlenewsNext

प्‍योंगयांग - उत्‍तर कोरियाचा सनकी हुकूमशहा किम जोंग उन (kim jong un ) यांने नुकताच एक नवा कायदा आणला आहे. या कायद्यात, उत्‍तर कोरियातील परदेशी प्रभाव संपवण्यासाठी परदेशी चित्रपट, कपडे आणि अयोग्य भाषेचा वापर केल्यास मृत्यूदंडापासून ते कारागृहापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी, किम जोंग उनने एका व्यक्तीला, तो केवळ दक्षिण कोरियन चित्रपटासह पकडला गेला म्हणून मृत्यूदंड दिला होता. (North korea kim jong un is waging war on slang jeans and foreign films)

यून मि सो त्यावेळी 11 वर्षांची होती तेव्हा उत्‍तर कोरियन व्‍यक्तीला मृत्यूदंड देण्यात आला होता. त्यावेळी, त्याच्या शेजाऱ्यांनाही या मृत्यूदंडाची संपूर्ण प्रक्रिया पाहण्याचा आदेश देण्यात आला होता. सो ने बीबीसी सोबत बोलताना सांगितले, की जर तुम्ही ही मृत्यूदंडाची शिक्षा पाहिली नाही, तर तो राजद्रोह मानला जाईल. एवढेच नाही, तर अश्‍लिल व्हिडिओची तस्‍करी करून आणण्याची शिक्षा मृत्यूदंडही असू शकते, असेही उत्तर कोरियाचे सैनिक स्पष्ट करत होते.

घरात पॉर्न बघत होता मुलगा, हुकूमशहा किम जोंग उनने पूर्ण परिवाराला सुनावली शिक्षा!

सो म्हणाली,  हे पाहणे तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी होते. माझे डोळे पाण्याने डबडबले होते. उत्‍तर कोरियाच्या सैनिकांनी त्या व्यक्तीला गोळी घातली होती. आपण कल्पना करा, की एक असा देश जेथे सरकारकडून सातत्याने लॉकडॉउन लावला जातो आणि इंटरनेटही नसते. तेथे कुठल्याही प्रकारचा सोशल मिडिया नाही. केवळ काही सरकारी टीव्ही चॅनलच आहेत. या चॅनल्सवर केवळ, देशातील नेत्यांना आपल्याकडून काय ऐकण्याची इच्छा आहे, हेच सांगितले जाते. अशी स्थिती उत्तर कोरीयाची आहे.

मीडिया सामग्री आढळल्यास फाशीची शिक्षा -
आता किम जोंग उन प्रशासनाने 'प्रतिक्रियात्मक' विचारांविरूद्ध नवा कायदा तयार केला आहे. जर, दक्षिण कोरिया, अमेरिका अथवा जपानच्या मिडिया सामग्रीसह कुणी आढळून आले, तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल. एवढेच नाही, तर हे पाहतांना जे कुणी पकडले जाईल त्याला 15 वर्षांचा कारावास होऊ शकतो. तसेच, देशातील यूथ लीगने तरुणांतील समाजवादविरोधी विचारसरणीविरोधात अॅक्‍शन घ्यावी, असेही किम याने नुकतेच एक पत्र लिहून म्हटले होते.

किम जोंग उनची पत्नी गेल्या एक वर्षापासून गायब? लोक विचारू लागले आहेत प्रश्न....

तरुणांमध्ये परदेशी भाषणे, हेअर स्‍टाइल आणि कपड्यांचा प्रसार रोखण्याची किमची इच्छा आहे. हे घातक विष असल्याचे त्याने म्हटले आहे.

Web Title: North korea kim jong un is waging war on slang jeans and foreign films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.