उत्तर कोरियाने अडचणीच्या काळात भूक भागवणारे कपडे आणले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 01:26 PM2019-01-29T13:26:27+5:302019-01-29T13:26:54+5:30

किम याने लाँच केलेल्या या कपड्य़ांमध्ये पुरुषांसाठी जॅकेट्स आणि महिलांसाठी शनैल कंपनीच्या डिझायनर वॉर्डरोबची नक्कल सहभागी आहे.

North Korea launch clothing to cure hunger during the crisis... | उत्तर कोरियाने अडचणीच्या काळात भूक भागवणारे कपडे आणले...

उत्तर कोरियाने अडचणीच्या काळात भूक भागवणारे कपडे आणले...

Next

प्योंगयांग : उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन याने काही फॅशन उत्पादने लाँच केली आहेत. मोठ्या काळापासून गरीबी आणि अन्नासाठी संघर्ष करणाऱ्या या देशामध्ये किम याने हे कपडे लाँच केले आहेत. या कपड्यांची खास बाब म्हणजे हे कपडे भूक लागल्यानंतर खाताही येणार आहेत. 


किम क्लोथिंग रिसर्च सेंटरमध्ये हे कपडे विकसित करण्यात आले आहेत. या कापडामध्ये  फ्लॅनलेट फॅब्रिक्स वापरण्यात आले आहे. हे फॅब्रिक प्रोटीन, अमिनो अॅसिड, फ्रूट ज्यूस, आयर्न आणि कॅल्शिअमने बनविण्यात आले आहे. 


किम याने लाँच केलेल्या या कपड्य़ांमध्ये पुरुषांसाठी जॅकेट्स आणि महिलांसाठी शनैल कंपनीच्या डिझायनर वॉर्डरोबची नक्कल सहभागी आहे. शिवाय गकी कंपनीच्या हँडबॅगचीही नक्कल करण्यात आली आहे. हे कपडे स्मार्ट असल्याचा दावा किम सरकारने केला आहे. याच्या मदतीने आरोग्याची काळजी घेता येते. तसेच अडचणीच्या काळात भूक लागल्यास कपडे खाऊन भूकही भागविता येते. 
हे कपडे चीनसाठी 1990 मधील फॅशन वाटत आहेत, परंतू उत्तर कोरियासाठी हे कपडे लेटेस्ट फॅशन आहेत आणि या स्टाईलच्या कपड्यांना पसंतीही मिळत आहे. 
 

Web Title: North Korea launch clothing to cure hunger during the crisis...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.