उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग पुन्हा गायब, अफवांना उधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:18 PM2020-06-30T23:18:59+5:302020-06-30T23:22:32+5:30
किम जोंग हे सर्वात शेवटी 7 जून रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. यावेळी त्यांनी, कोरियातील वर्कर्स पार्टीच्या 7व्या केंद्रीय समितीच्या 13 व्या पॉलिटिकल ब्यूरोच्या बैठकीत भाग घेतला होता.
प्योंगयांग -उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन सातत्याने काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या काही आठवड्यांपूर्वीही ते गायब झाल्याने चर्चेत आले होते. एवढेच नाही, तर काहींनी ते गंभीर आजारी असल्याचा आणि काहींनी त्यांचा मृत्यू झाल्याचा कयासही लावला होता. यानंतर ते अचानकपणे एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी हजर झाले. तेव्हा कुठे या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. मात्र, आता किम जोंग पुन्हा गायब झाल्याने अफवांना उधान आले आहे. ते तब्बल तीन आठवड्यांपासून गायब आहेत.
तीन महिन्यांत तिसऱ्यांदा गायब -
किम जोंग हे गेल्या तीन महिन्यांपासून सात्याने गायब होत आहे. 36 वर्षीय किम हे सर्वप्रथम 20 दिवस गायब झाले होते. तेव्हा, त्यांच्या हृदयावरील शस्त्रक्रियेदरम्यान काही गुंतागुंत निर्माण झाली आणि ते गंभीर आजारी पडले अथवा त्यांचा मृत्यू झाला असावा, अशा चर्चाना उधान आले होते. मात्र, 1 मेरोजी ते अचानकच प्रकट झाले आणि त्यांनी एका खतनिर्मिती कारखान्याचे उद्घाटन केले होते. यानंतर कीम पुन्हा तीन आठवडे गायब झाले होते. ते पुन्हा 24 मेरोजी प्रकट झाले. मात्र आता ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा गायब झाले आहेत. यामुळे पुन्हा त्यांच्या मृत्यूसंदर्भात अफवा उठायला सुरुवात झाली आहे. गायब होण्यापूर्वी त्यांनी देशाच्या अण्वस्त्र सज्जतेसंदर्भात भाष्य केले होते. काही तज्ज्ञांनी तर, सरकारी माध्यमे किम यांच्या जागी बनावट व्यक्ती दाखवत आहेत, असा अंदाजही व्यक्त केला आहे.
कोरिया द्विपकल्पात सात्यानेत तणाव वाढत आहे. यामुळे किम जोंग यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी जनतेला केले आहे. किम यांनी उत्तर कोरियाची धुरा हाती घेऊन चार वर्षेपूर्ण झाली आहेत. मात्र गेल्या वर्षी येथे ज्याप्रमाणे जल्लोष करण्यात आला होतो, तसा यावर्षी पाहायला मिळाला नाही.
किम हे गेल्या तीन महिन्यांत आता सर्वाधिक काळ गायब झाले आहेत. गेल्या आठवड्यांतच जपानच्या एका मंत्र्याने कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणऊन किम जोंग हे सार्वजनिक जीवनापासून दूर असल्याचे म्हटले होते.
किम जोंग हे सर्वात शेवटी 7 जून रोजी दिसले -
किम जोंग हे सर्वात शेवटी 7 जून रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. यावेळी त्यांनी, कोरियातील वर्कर्स पार्टीच्या 7व्या केंद्रीय समितीच्या 13 व्या पॉलिटिकल ब्यूरोच्या बैठकीत भाग घेतला होता. सध्या देशाचा कारभार त्याची बहीण आणि उत्तराधिकारी समजल्या जाणाऱ्या किम यो जोंग पाहत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियाला सैन्य कारवाईची धमकीही दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या -
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!
अॅप्सनंतर चीनला आणखी एक हादरा देण्याच्या तयारीत सरकार? 'या' मोठ्या कंपनीला बसू शकतो 'जोर का झटका'!
India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'