उत्तर कोरियाचा हुकूमशहा मिसाईल चाचणीवेळी जखमी झाला? कोरियाई अधिकाऱ्याने केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:29 PM2020-04-27T15:29:00+5:302020-04-27T15:29:16+5:30
किम जोंग १४ एप्रिलपर्यंत चांगले होते. त्यावेळी त्यांनी मिसाईल चाचणीचे आदेश दिले होते
प्योंगयांग – उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन ११ एप्रिलनंतर लोकांच्या समोर आला नाही. जगभरातील मीडियामध्ये किम जोंग उनबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच एका माजी कोरियाई अधिकाऱ्याने दावा केला आहे की, हुकूमशहा किम जोंग उन मिसाईल चाचणीच्या वेळी जखमी झाले आहेत त्यामुळेच ते सध्या दिसत नाहीत.
किम जोंग उनच्या वर्कस पार्टीचे एक अधिकारी ली जिओंग होने दक्षिण कोरियातील वृत्तपत्रात लिहिलं आहे की, किम जोंग १४ एप्रिलपर्यंत चांगले होते. त्यावेळी त्यांनी मिसाईल चाचणीचे आदेश दिले होते. त्यामुळे याच दरम्यान ते जखमी झाले असावेत म्हणून दिसत नसावे अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. हो यांनी सांगितले की, अशा बातम्या येत आहेत की, किम जोंग मिसाईल चाचणीवेळी उपस्थित नव्हते. मात्र मिसाईल चाचणी आणि लढाऊ विमान यांचे ट्रेनिंनचे कोणतेही फुटेज जारी केले नाही. त्यामुळे मिसाईलच्या मलब्यामध्ये आग लागल्याने काही दुर्घटना घडली असावी असं मला वाटतं.
तसेच हो यांनी किम जोंग उन ब्रेन डेड झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.वॉश्गिंटन रिपोर्टनुसार किम जोंगच्या मृत्यूच्या बातमीने उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयोंगमध्ये लोकांनी घाबरून खरेदी सुरु केली आहे. लोकांनी तांदूळ, दारु, मासे आणि खाण्याच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किम जोंग यांच्या तब्येतीवरुन जगभरात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. जपान आणि हाँगकाँगच्या रिपोर्टनुसार किम जोंगची तब्येत नाजूक आहे. तर दक्षिण कोरियाने दावा केला आहे की, किम जोंग उन यांची तब्येत चांगली आहे. तसेच किम जोंग उन कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी अज्ञात ठिकाणी लपल्याचाही दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, उत्तर कोरिया बातमी लपवण्यासाठी जगभरात कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे किम जोंग उन कुठेच दिसत नाहीत याबाबत स्पष्टता नाही. या काळात दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती फॉरेन पॉलिसी सल्लागार चुंग इन मून ने सांगितले की, किम जिवंत आहे आणि ठणठणीत आहे. तसेच किम बाबतीत आमच्या सरकारचं धोरण कायम आहे असं मून यांनी सीएनएनला सांगितले.
अन्य बातम्या वाचा
राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना ‘या’ निर्णयाचा फटका; एप्रिलचा पगार लांबणीवर पडणार?
जाणून घ्या, भारतात कोरोनाचा संसर्ग कधी संपुष्टात येणार?; सिंगापूर युनिव्हर्सिटीचा मोठा दावा!
...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज
यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन