हुकूमशहा किम जोंग उनची सटकली; बेकायदेशीर सीडी विकणाऱ्याला ५०० जणांसमोर १२ गोळ्या घातल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 09:31 AM2021-05-31T09:31:08+5:302021-05-31T09:33:05+5:30

या व्यक्तीला साऊथ कोरियन सिनेमा, म्युझिक आणि ब्रॉडकास्ट स्टोरी अवैधरित्या विकत असताना पकडलं.

North korean leader kim jong un firing squad executes man for selling illegal music cd and usb | हुकूमशहा किम जोंग उनची सटकली; बेकायदेशीर सीडी विकणाऱ्याला ५०० जणांसमोर १२ गोळ्या घातल्या अन्...

हुकूमशहा किम जोंग उनची सटकली; बेकायदेशीर सीडी विकणाऱ्याला ५०० जणांसमोर १२ गोळ्या घातल्या अन्...

googlenewsNext
ठळक मुद्देत्या व्यक्तीचं अखेरचं नाव ली असं होतं. तो वॉनसन फार्मिंग मेनेजमेंट कमीशनमध्ये चीफ इंजिनिअरचं काम करत होता.तो त्या सीडी आणि यूएसबी पाच डॉलर ते १२ डॉलरपर्यंत विकत होता.बेकायदशीर काम करणाऱ्या कोणालाही न घाबरता जगण्याची परवानगी देऊ नये

उत्तर कोरिया(North Korea) चा हुकूमशहा किम जोंग उन(Kim Jong Un)च्या आदेशावरून पुन्हा एकदा त्यांच्या फायरिंग स्क्वाडनं(Firing Sqaud)नं एका व्यक्तीला निशाणा बनवलं आहे. यावेळी दक्षिण कोरियाई सिनेमा आणि म्युझिक सीडी अवैधरित्या विकणाऱ्याला ५०० लोकांच्या समोर गोळ्या मारण्यात आल्या आहेत. डेलीएनकेच्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीचं अखेरचं नाव ली असं होतं. तो वॉनसन फार्मिंग मेनेजमेंट कमीशनमध्ये चीफ इंजिनिअरचं काम करत होता.

या व्यक्तीला साऊथ कोरियन सिनेमा, म्युझिक आणि ब्रॉडकास्ट स्टोरी अवैधरित्या विकत असताना पकडलं. लीने मृत्यूपूर्वी त्याचा गुन्हा कबूल केला होता. तो म्हणाला की, तो त्या सीडी आणि यूएसबी पाच डॉलर ते १२ डॉलरपर्यंत विकत होता. एप्रिल २०२१ मध्ये ली याला फायरिंग स्क्वाडकडून गोळ्या मारण्यात आल्या. यावेळी लीच्या कुटुंबासह ५०० जण उपस्थित होते. मागील वर्षाच्या अखेरीस लागू झालेल्या ‘Anti-reactionary thought law’ अंतर्गत ‘Anti-socialist element’ कायद्यात दोषी ठरवल्यानंतर त्याला ही शिक्षा देण्यात आली.

रिपोर्टनुसार, नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांकडून गंगवोन प्रांतात ‘Anti-reactionary thought law’ अंतर्गत बेकायदेशीर काम करणाऱ्याला ही पहिली शिक्षा दिली आहे. यापूर्वी अशा गुन्ह्यात ली सारख्यांना लेबर अथवा रि एज्युकेशन कँम्पला पाठवलं जात होतं. इतक्या साध्या गुन्ह्यात एवढी मोठी शिक्षा दिल्यानं हे ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल.

१२ गोळ्या घातल्या

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशाप्रकारे गैरव्यवहार आणि बेकायदेशीर कृत्य करणं हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं जे आपल्या समाजाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बेकायदशीर काम करणाऱ्या कोणालाही न घाबरता जगण्याची परवानगी देऊ नये. सूत्रांच्या माहितीनुसार जेव्हा अधिकाऱ्यांनी ली याला दोषी ठरवलं त्यानंतर त्याला १२ गोळ्या घालण्यात आल्याचा आवाज लोकांनी ऐकला.

‘ली’च्या कुटुंबाला कैदी बनवलं

ली याला गोळ्या झाडल्यानंतर त्यांचा मृतदेह एका पेटीत बंद करून घेऊन गेले. हे दृश्य पाहून त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी जागेवरच चक्कर येऊन कोसळले. राज्य सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना उठवलं आणि देशाची कैदी म्हणून जेलमध्ये पाठवलं. सूत्रांच्या माहितीनुसार ली च्या पत्नीला अधिकाऱ्यांनी एका तुकड्याप्रमाणे उचललं आणि ट्रकमध्ये फेकून दिलं. परंतु दहशतीमुळे कोणीच काही बोलू शकलं नाही.

Web Title: North korean leader kim jong un firing squad executes man for selling illegal music cd and usb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.