उत्तर कोरियाच्या राजदूताला अखेर हाकलले

By admin | Published: March 6, 2017 04:30 AM2017-03-06T04:30:25+5:302017-03-06T04:30:25+5:30

उत्तर कोरियाचे राजदूत कांग चोल यांना मलेशियाने देश सोडून जाण्यास ४८ तासांची मुदत दिली आहे

North Korea's ambassador finally escapes | उत्तर कोरियाच्या राजदूताला अखेर हाकलले

उत्तर कोरियाच्या राजदूताला अखेर हाकलले

Next


बँकॉक : उत्तर कोरियाचे राजदूत कांग चोल यांना मलेशियाने देश सोडून जाण्यास ४८ तासांची मुदत दिली आहे. चोल हे अस्वीकार्य व्यक्ती असल्याचे मलेशियाने शनिवारीच जाहीर केले होते.
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा सावत्र भाऊ किम जोंग-नाम यांच्या झालेल्या हत्येनंतर उभय देशांतील संबंधांत कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. चोल हे मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बोलावूनही कार्यालयात न आल्यामुळे त्यांना देशातून हाकलण्याचा निर्णय झाला. जगभर बंदी असलेल्या रसायनाचा वापर किम जोंग-नाम यांना ठार मारण्यासाठी झाला हा मलेशियाच्या तपास यंत्रणेने काढलेल्या निष्कर्षाबद्दल चोल यांनी शंका उपस्थित केली व इतरही आक्षेपार्ह विधाने केली होती.

Web Title: North Korea's ambassador finally escapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.