किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 09:14 AM2020-04-21T09:14:43+5:302020-04-21T09:37:15+5:30

किम जोंग उनच्या आजोबांची दुसरे किम सुंग यांची  १५ एप्रिलला जयंती होती. यावेळी किम उपस्थित राहू शकला नव्हता. यामुळे किमच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

North Korea’s Kim Jong Un in grave danger after surgery report hrb | किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका

किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका

Next

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली असून यामुळे त्याच्या जिवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट अमेरिकी गुप्तचरांनी केला आहे. 


रॉयटर्ससह आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. किम जोंग उनच्या आजोबांची दुसरे किम सुंग यांची  १५ एप्रिलला जयंती होती. यावेळी किम उपस्थित राहू शकला नव्हता. यामुळे किमच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. ३६ वर्षांच्या किमवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना माहिती असून यावर सीआयए, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने लगेचच प्रतिक्रिया दिलेली नाही. 


दक्षिण कोरियाने सोमवारी म्हटले आहे की, किमवर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया या महिन्याच्या सुरुवातीलाच करण्यात आली आहे. तर उत्तर कोरियाच्या डेली एनके या वृत्त संस्थेला एका अज्ञात अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार किम जोंग उनला गेल्या ऑगस्टपासूनच हृदयविकाराचा त्रास जाणवत होता. मात्र, माऊंट पैक्तूला वारंवार भेट दिल्याने हा त्रास वाढला. 


किम जोंग उनमध्ये लठ्ठपणा, तणाव आणि अती धुम्रपान करत असल्याने हृदयविकार बळावला. उत्तर कोरियाने नुकतेच देशात एकही कोरोनाचा पेशंट नसल्याचा दावा केला होता. केवळ तीन रुग्ण होते, मात्र ते देखील बरे झाल्याचा दावा केला केला होता. फेब्रुवारीमध्येच कोरियाने सीमा बंद केल्या होत्या. 


दुसऱ्या एका रिपोर्टनुसार हँगसन येथील माऊंट कुमगँग हॉस्पिटलमध्ये किमवर १२ एप्रिललाच हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली असून तेथीलच बंगल्यामध्ये पुढील उपचार सुरु आहेत. 

'उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल'; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या

योगी आदित्यनाथांच्या मावशीला सीमेवर रोखले; जिल्हाधिकाऱ्यांचा पासही होता

Read in English

Web Title: North Korea’s Kim Jong Un in grave danger after surgery report hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.