उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 07:51 PM2024-05-28T19:51:34+5:302024-05-28T19:53:05+5:30

North Korea Military Spy Satellite Launch Fails: अंतराळातून लष्करी हेरगिरी करण्याच्या उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. सोमवारी उत्तर कोरियाने एक लष्करी हेरगिरी उपग्रह प्रक्षेपण करण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला.

North Korea's spy satellite launch failed, rocket targets exploded within seconds of takeoff | उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या

उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या

अंतराळातून लष्करी हेरगिरी करण्याच्या उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. सोमवारी उत्तर कोरियाने एक लष्करी हेरगिरी उपग्रह प्रक्षेपण करण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला असून, प्रक्षेपण केल्यानंतर काही काळातच उपग्रह घेऊन जाणाऱ्या रॉकेटच्या ठिकऱ्या उडाल्या.

जर उत्तर कोरिया या उपग्रह प्रक्षेपणात यशस्वी ठरला असता तर अंतराळात आपल्या दुसरा हेरगिरी उपग्रह तैनात करण्यात त्याला यश आले असते. मात्र लष्करीदृष्ट्या सक्षम होत असलेल्या उत्तर कोरियाला या अपयशामुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या वर्षी या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचे दोन प्रयत्न अपयशी ठरले होते. यावेळीही प्रक्षेपण केल्यानंतर उपग्रह घेऊन जाणारं रॉकेट अवघ्या ३० सेकंदांमध्येच फुटले. 

मात्र असं असलं तरी उत्तर कोरियाने मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला पहिला हेरगिरी उपग्रह अंतराळात तैनात करण्यात यश मिळवले होते. उत्तर कोरियाच्या नॅशनल एअरोस्पेस टेक्नॉलॉजीने सांगितले की, नव्या उपग्रहाला घेऊन जाणाऱ्या रॉकेटमध्ये स्फोट झाला. रॉकेट हवेत असताना याची पहिली स्टेज पूर्णपणे कार्यरत होऊ शकली नाही. अखेरीस हे रॉकेट हवेतच फुटले.

प्राथमिक तपास अहवालामधून उत्तर कोरियाचे उपग्रह घेऊन जाणारं रॉकेट हे त्याच्या स्वदेशी लिक्विड फ्युएल रॉकेट मोटारीमध्ये बिघाड झाल्याने कोसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या अपघातामागची इतर कारणांचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, प्रक्षेपणादरम्यान उत्तर कोरियाचं रॉकेट कोसळल्याची माहिती सर्वप्रथम दक्षिण कोरिया आणि जपानने जगाला दिली.  

 

Web Title: North Korea's spy satellite launch failed, rocket targets exploded within seconds of takeoff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.