कोरोना लस घेतल्यानंतर तरूणीच्या स्तनाचा आकार वाढला; डॉक्टर म्हणाले 'चिंता नको!'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 03:55 PM2021-07-12T15:55:33+5:302021-07-12T16:14:12+5:30
Coronavirus Vaccine Side Effects : नॉर्वेमध्ये एका 17 वर्षाच्या एम्मा नावच्या तरूणीने कोरोना लस घेतल्यानंतर तिला दुष्परिणाम जाणवले.
ऑस्लो : कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनावरील ही लस घेतल्यानंतर जगभरातील अनेक लोकांमध्ये याचे दुष्परिणाम (साइड इफेक्ट) होत असल्याचेही समोर येत आहे. अशीच एक काहीशी वेगळी घटना समोर आली आहे. नॉर्वेमध्ये एका 17 वर्षाच्या एम्मा नावच्या तरूणीने कोरोना लस घेतल्यानंतर तिला दुष्परिणाम जाणवले.
एम्माने कोरोनावरील फायझरची लस घेतल्याच्या काही दिवसानंतर तिच्या स्तनांचा आकार मोठा झाला. त्यामुळे भयभीत झालेल्या एम्माने डॉक्टरांकडे धाव घेतली. मात्र, डॉक्टरांनी तिला चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.नार्वेमधील स्थानिक माध्यम एनआरकेने दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारचे साइड इफेक्ट झालेली एम्मा ही एकटीच महिला नाही. ही समस्या इतरही काही महिलांना जाणवली. एम्माने म्हटले की, 'माझ्यासारखा त्रास आणखी काही महिलांना झाल्याचे मी पाहिले आहे. त्यावेळी मी ऑनलाइन सर्च करून माहिती घेतली. अमेरिकेत याबाबत काही लेख प्रकाशित झाला आहे.'
झिका व्हायरसचा धोका वाढतोय, दिल्ली-मुंबईसह अनेक शहरे अलर्टवर https://t.co/Vx6GWcLnqg#ZikaVirus
— Lokmat (@MiLOKMAT) July 12, 2021
लिम्फ नोडमुळे साइड इफेक्ट?
हे साइड इफेक्ट सूजलेल्या लिम्फ नोडसंबंधीत असू शकतात. लस घेतल्यानंतर जाणावणारे असामान्य लक्षणे नाहीत, असे एका तज्ज्ञांने सांगितले. तर नार्डलँड रुग्णालयातील डॉक्टर हेइनरिच बॅकमॅन यांनी सांगितले की, काही लस घेतलेल्या महिलांना ज्या बाजूने सिरिंज लावण्यात आली. त्या बाजूकडील लिम्फ नोडचा आकार मोठा होत असल्याचे आढळून आले. हा वाढलेला आकार दिसून येतो. यामुळे महिलांनी घाबरून जाऊ नये असेही हेइनरिच बॅकमॅन यांनी म्हटले आहे.
नार्डलँड रुग्णालयाने महिलांना चार आठवड्यांची प्रतिक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. नॉर्वेच्या आरोग्य विभागाशी संबंधित असलेले स्टेइनार मॅडसेन यांनी सांगितले की, त्यांच्या विभागाला स्तनाचा आकार वाढल्याबाबत तक्रार मिळाली नाही. मात्र, असे असल्यास सूजलेल्या लिम्फ नोड्समुळे स्तनांचा आकार वाढला असू शकतो. तसेच, लस घेतलेल्यांपैकी 10 टक्के जणांच्या लिम्फ नोडमध्ये सूज येऊ शकते. त्यामुळे स्तनाचा आकार वाढू शकतो. अशा महिलांना स्तनाचा आकार मोठा झाला असल्याचे वाटू शकते, असेही स्टेइनार मॅडसेन म्हणाले.
जगातील सर्वांत महागडा बर्गर 'The Golden Boy'!, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का https://t.co/lTMTG4QcNz#burgers
— Lokmat (@MiLOKMAT) July 12, 2021