NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:15 PM2024-10-30T12:15:05+5:302024-10-30T12:15:47+5:30

हिज्बुल्लाच्या नव्या 'चीफ'चा फोटो शेअर करत इस्रायलचे सूचक ट्विट

Not for long said Israel Minster after posting Hezbollah Chief Naim Qassem photo countdown begins | NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला!

NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला!

Hezbollah Chief Naim Qassem, Israel Lebanon Fight: लेबनानची दहशतवादी संघटना हिजबुल्लाने जुन्या म्होरक्याच्या हत्येनंतर अखेर नवा प्रमुख निवडला. नईम कासीम हा हिज्बुल्लाचा नवा 'चीफ' आहे. हसन नसरल्लाहच्या हत्येनंतर जवळपास एक महिन्यानंतर हिजबुल्लाने आपला नवा नेता निवडला. गेल्या महिन्यात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हसन नसरल्लाह मारला गेला होता. त्यानंतर हिजबुल्लाने एक निवेदन जारी करून माहिती दिली की, नईम कासिम हसन नसराल्लाहची जागा घेणार आहे. असे असले तरी हिज्बुल्लाचा नवा चीफ फार काळ टिकणार नाही. त्याचा लवकरच खात्मा केला जाईल, असे सूचक ट्विट इस्रायलच्या इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी केले.

हिजबुल्लाहने जवळपास महिनाभरानंतर आपला नवा नेता निवडला. इस्रायलने गेल्या दोन महिन्यांत डझनभर हिजबुल्लाचे नेते आणि कमांडर ठार मारले आहेत. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी मंगळवारी सांगितले की, हिजबुल्लाचा नवा प्रमुख नईम कासीम यांची नियुक्ती तात्पुरती आहे आणि तो जास्त काळ या पदावर राहणार नाही. गॅलंटने X वरील त्याच्या एका पोस्टमध्ये सूचित केले आहे की हिजबुल्लाहचा नवा प्रमुख आता इस्रायलच्या 'हिटलिस्ट'वर आहे.

हसन नसरल्लाह यांनी जवळपास तीन दशके या संघटनेचे नेतृत्व केले. नसराल्लाहच्या नेतृत्वाखाली हिजबुल्लाहने लेबनानमध्ये आपली संघटना मजबूत केली. आता हिजबुल्लाच्या निर्णय घेणाऱ्या शूरा कौन्सिलने दीर्घ विचारविनिमयानंतर नईम कासीमची नवीन नेता म्हणून निवड केली. कासीम बराच काळ नसरल्लाहचा साथीदार म्हणून काम करत होता. त्याच्या मृत्यूनंतर तो हिजबुल्लाचा कार्यवाहक प्रमुख म्हणून काम करत होता. विजय मिळेपर्यंत ते नसराल्लाहच्या धोरणांवर काम करत राहतील आणि अल-अक्सा आणि पॅलेस्टाइन जनतेला एकटे सोडणार नाहीत, असे हिजबुल्लाहने स्पष्ट केले.

इस्रायलने नसराल्लाहच्या हत्येपूर्वी या संघटनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची हत्या केली होती. अशा परिस्थितीत नईम कासीम इस्रायलच्या हल्ल्यांना तोंड देण्यासोबतच आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तशातच आता नवा प्रमुख इस्रायलच्या निशाण्यावर असल्याने युद्ध कुठलं वळण घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Web Title: Not for long said Israel Minster after posting Hezbollah Chief Naim Qassem photo countdown begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.