'मी येतोय, पण आता नाही नंतर करणार भारताशी मोठा व्यापार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:36 AM2020-02-20T03:36:08+5:302020-02-20T03:36:29+5:30
पहिल्या दौऱ्याआधी ट्रम्प यांचे संकेत
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौºयाची मोठ्या जोमाने तयारी केली जात असून, त्यांच्या दौºयात द्विपक्षीय व्यापार करारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यांनी स्वत: आपल्या पहिल्या दौºयात नव्हे; तर नंतर भारतासोबत मोठा व्यापार करार करणार असल्याचे संकेत दिले. नोव्हेंबरमध्ये होणाºया राष्टÑाध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी द्विपक्षीय करार होईल की नाही, हे ठाऊक नाही, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
२४ आणि २५ फेब्रुवारी रोजी ट्रम्प भारताच्या दौºयावर येणार आहेत. संयुक्त अॅण्ड्र्यूज तळाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. भारतासोबत आम्ही खूप मोठा व्यापार करणार आहोत, असे सांगताना ट्रम्प अमेरिका-भारत व्यापारसंबंधावर नाराजी व्यक्त केली. भारताचा आमच्याशी चांगला व्यवहार नाही; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी मला सांगितले की, विमानतळ आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी ७९ लाख लोक असतील. ज्या स्टेडियमवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ते जगातील सर्वांत मोठे स्टेडियम असेल.‘अमेरिका प्रथम’ या धोरणाचा जोरदारपणे पाठपुरावा करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्वी अमेरिकी उत्पादनांवर भरमासाठ शुल्क लावल्याने भारताला ‘प्रशुल्कांचा’ बादशहा म्हटले होते. भारतासोबतच्या व्यापार वाटाघाटीत अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारे रॉबर्ट लाईटहायझर हे ट्रम्प यांच्यासमवेत भारत दौºयावर नसतील, असे दिसते. तथापि, अधिकाऱ्यांनी ते ट्रम्प यांच्यासमवेत येण्याची शक्यता पूर्णत: नाकारलेली नाही.
संरक्षण, व्यापारासह विविध मुद्द्यांवर चर्चा
दरम्यान, नवी दिल्लीत भारताचे विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २५ फेब्रुवारी रोजी संरक्षण, व्यापारासह विविध क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यावर चर्चा करतील. ट्रम्प यांच्यासमवेत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारत दौºयावर येत आहे. अहमदाबादेत आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम ह्युस्टनमधील ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमासारखाच असेल. सूत्रांनुसार व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यात भारत- अमेरिकेला घाई करायची नाही. ट्रम्प यांच्या दौºयात संरक्षण क्षेत्राशी संबंधित काही करार होऊ शकतात.