लख्वीसह ७ आरोपींना नोटीस

By admin | Published: September 9, 2016 04:35 AM2016-09-09T04:35:39+5:302016-09-09T04:35:39+5:30

पाकच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने १० दहशतवाद्यांनी भारतात पोहोचण्यासाठी वापरलेल्या नावेची तपासणी करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना लष्कर

Notice to 7 accused including Lakhvi | लख्वीसह ७ आरोपींना नोटीस

लख्वीसह ७ आरोपींना नोटीस

Next

लाहोर : पाकच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने १० दहशतवाद्यांनी भारतात पोहोचण्यासाठी वापरलेल्या नावेची तपासणी करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना लष्कर ए तोयबाचा कमांडर झकीउर रहमान लख्वी याच्यासह सात आरोपी आणि सरकारला बुधवारी नोटीसा बजावल्या.
अल-फौज ही नाव सध्या कराचीच्या बंदरात आहे. या नावेच्या तपासणीसाठी आयोगाने कराचीला जाऊ नये हा कनिष्ठ न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाने फेटाळला होता. (वृत्तसंस्था)


मोजक्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करून भागणार नाही. तुम्हाला आपल्या भुभागात आश्रय घेऊन शेजाऱ्यांना नुकसान पोहचवू पाहणाऱ्या दहशतवाद्यांवरही कारवाई करावी लागेल, अशा कठोर शब्दांत अमेरिकेने गुरुवारी पाकिस्तानला सुनावले.
चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरविरुद्ध भारत व अमेरिका एक झाले असल्याचे हाफिज सईद याचे विधान अमेरिकेने फेटाळून लावले. हाफिज २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे.
हा कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मीरातून जातो. पाकने एकतर सईदला आमच्या स्वाधीन करावे किंवा मुंबई हल्ल्याबाबत ठोस पावले उचलून दाखवावित, असे भारताने म्हटले होते.
या पार्श्वभुमिवर सईदने वरील टीपणी केली होती. दैनंदिन पत्रकार परिषदेत बोलताना उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितले की, पाकशी आमचे अत्यंत बळकट संबंध आहेत.

Web Title: Notice to 7 accused including Lakhvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.