Novavax: कोरोना विरोधात आणखी एक लस; 'नोवाव्हॅक्स' लस ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 06:14 PM2021-06-14T18:14:30+5:302021-06-14T18:16:36+5:30

कोरोना विषाणूनं गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून संपूर्ण जगाला वेठीस धरलेलं असताना कोरोना विरोधातील लस निर्मितीत शास्त्रज्ञांना आणखी एक यश आलं आहे.

novavax covid 19 vaccine more than 90 percent effective | Novavax: कोरोना विरोधात आणखी एक लस; 'नोवाव्हॅक्स' लस ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा!

Novavax: कोरोना विरोधात आणखी एक लस; 'नोवाव्हॅक्स' लस ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा!

Next

कोरोना विषाणूनं गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून संपूर्ण जगाला वेठीस धरलेलं असताना कोरोना विरोधातील लस निर्मितीत शास्त्रज्ञांना आणखी एक यश आलं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक देश आता जास्तीत जास्त लसीकरणावर भर देत आहे. अशाच लस निर्मिती करणाऱ्या नोवाव्हॅक्स कंपनीनं त्यांनी आणलेली लस कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट विरोधात देखील ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. कंपनीनं अमेरिकेत मोठ्या प्रमाणात यावर अभ्यास केल्यानंतर माहिती जाहीर केली आहे. 

नोवाव्हॅक्स या अमेरिका स्थित कंपनीनं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटसोबत करार केला आहे. याअंतर्गत सीरम इन्स्टिट्युटमध्ये नोवाव्हॅक्सचे २०० डोस तयार केले जाणार आहेत. 

"नोवाव्हॅक्स लस कोरोना विरोधात ९० टक्के प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे आणि सुरुवातीच्या आकडेवारीनुसार लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही समोर आलं आहे", असं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, नोवाव्हॅक्सची लसची साठवण आणि वाहतूक करणं अतिशय सोपं आहे. त्यामुळे विकसनशील देशांमध्ये लस पोहोचविण्याच्या उद्दीष्टांमध्ये नोवाव्हॅक्स लस खूप मोठं योगदान देण्याची शक्यता आहे. 

अमेरिका आणि युरोपमध्ये सप्टेंबरच्या अखेरपर्यंत नोवाव्हॅक्सच्या वापराला मंजुरी मिळेल यादृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. मंजुरी मिळेपर्यंत दरमहा १० कोटी डोसची निर्मिती करण्यासाठी कंपनी सक्षम असल्याचं कंपनीचे प्रमुख स्टेनली एर्क यांनी सांगितलं. 

Web Title: novavax covid 19 vaccine more than 90 percent effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.