आता बीअरची पाइपलाइन
By admin | Published: June 7, 2017 12:30 AM2017-06-07T00:30:14+5:302017-06-07T00:30:14+5:30
घरगुती वापराचा गॅस, पाणी आणि तेल वाहून नेणाऱ्या पाइपलाइनबद्दल आपल्याला माहिती असते
घरगुती वापराचा गॅस, पाणी आणि तेल वाहून नेणाऱ्या पाइपलाइनबद्दल आपल्याला माहिती असते; परंतु जर्मनीमध्ये अशी पाइपलाइन अंथरली जात आहे की, जिच्याबद्दल ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ही पाइपलाइन आहे बीअरची. लोक नळ सुरू करून हवा तेव्हा बीअरचा आनंद घेऊ शकतील. उत्तर जर्मनीत आॅगस्ट महिन्यात जगातील सगळ्यात मोठा संगीत महोत्सव तीन दिवस चालणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्यांच्या सोयीसाठी ही पाइपलाइन अंथरली जात आहे. सुमारे ७५ हजार लोक यावेळी उपस्थित राहतील. त्यामुळे या तीनही दिवसांत बीअर थंड आणि ताजी राहण्यासाठी हा वेगळाच प्रयोग केला गेला आहे.
प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ही पाइपलाइन जवळपास ७ किलोमीटर लांब असेल. या पाइपलाइनमध्ये एवढा दाब सहन करण्याची क्षमता असेल की, दर सहा सेकंदांत बीअरच्या सहा बाटल्या भरल्या जातील. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार या महोत्सवात सरासरी प्रत्येक व्यक्ती ५.१ लिटर बीअर पिऊ शकेल.