आता हजारो मैलांवरूनही तुमच्या जवळच्या व्यक्तीला करा किस
By admin | Published: December 29, 2016 06:23 PM2016-12-29T18:23:17+5:302016-12-29T18:23:17+5:30
विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे जग जवळ आले आहे. ज्यामुळे आपल्यापासून हजारो मैल अंतरावर असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तीचा किस घेणेही शक्य होणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 29 - विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे जग जवळ आले आहे. मोबाइल, स्मार्टफोन, इंटरनेटमुळे आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधणे, त्या व्यक्तीला पाहणे शक्य झाले आहे. आतातर या क्षेत्रात असा एक शोध लागला आहे. ज्यामुळे आपल्यापासून हजारो मैल अंतरावर असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तीचा किस घेणेही शक्य होणार आहे.
वाचून आश्चर्य वाटलं असेल, पण हे शक्य आहे. तंत्रज्ञांनी असे एक उपकरण विकसित केले आहे. ज्याच्या माध्यमातून ही अशक्य बाब शक्य होणार आहे. किसिंजर असे या उपकरणाचे नाव असून, स्मार्टफोटनला हे उपकरण जोडल्यानंतर तुम्ही हजारो मैलांवर असलेल्या तुमच्या प्रिय व्यक्तीचा किस घेऊ शकाल. याद्वारे किस घेण्यासाठी दोन्ही व्यक्तींना आपले ओठ स्मार्टफोनला जोडलेल्या उपकरणावर ठेवून चुंबन घ्यावे लागेल. त्यानंतर हा किस मेसेजसारखा दुसऱ्या स्मार्टफोनवर असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल. व त्याला किसचा आनंद मिळेल. किस आणि मेसेंजर असे दोन शब्द एकत्र करून या उपकरणाचे किसिंजर असे नामकरण करण्यात आले आहे.
विविध कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात दाखल होऊ लागल्यानंतर दूर राहूनही किसचा आनंद देईल अशा उपकरणाची कल्पना पुढे आली होती. 2012 साली सिंगापूरमधील एआयएआऱटी लॅबचे संचालक डॉ. हूमन समानी यांनी यावर प्रयोग करून अशाप्रकारे संवाद साधणे शक्य असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, लंडन विद्यापीठाची पीएचडी विभागाची विद्यार्थिनी असलेल्या एम्मा यान झांग हिनेही, आपण अशाच प्रकारचे उपकरण विकसित केल्याचा दावा केला. हे उपकरण डॉ. सोमानी यांनी मांडलेल्या किसिंजरशी मिळतेजुळते आहे. तसेच भविष्यात ते अधिक विकसित होईल. असा ते विकसित करणाऱ्यांचा दावा आहे.
मात्र हे अॅप बाजारात येणास अवकाश आहे. त्यामुळे अशा प्रकारे दूर राहून किस घेण्यासाठी सर्वसामान्यांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.