...आता दुश्मन भारतच मदत करू शकतो; पाकिस्तानी मीडियाकडूनही मिळतोय सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 02:42 PM2023-03-20T14:42:27+5:302023-03-20T14:43:01+5:30

पाकिस्तानला पैसे दिले की दहशतवाद्यांना जातात, हा प्रघातच आहे. हे पैसे भारतविरोधी वापरले जातात. मग भारत कशाला पाकिस्तानींची मदत करेल.

...Now enemy India can only help; Advice is also being received from Pakistani media after Lahore Chamber meeting with India | ...आता दुश्मन भारतच मदत करू शकतो; पाकिस्तानी मीडियाकडूनही मिळतोय सल्ला

...आता दुश्मन भारतच मदत करू शकतो; पाकिस्तानी मीडियाकडूनही मिळतोय सल्ला

googlenewsNext

पाकिस्तान कर्माने बुडाला आहे. भारत सोडून, सगळ्या देशांकडे मदतीची भीक मागून झालीय. पण कोणी फाटक्या झोळीत पैसे टाकायला मागत नाहीय. पाकिस्तानला पैसे दिले की दहशतवाद्यांना जातात, हा प्रघातच आहे. हे पैसे भारतविरोधी वापरले जातात. मग भारत कशाला पाकिस्तानींची मदत करेल. यामुळे भारत देखील पुढे पाऊल टाकत नाहीय. शेजारच्या श्रीलंकेला हवी तेवढी मदत सुरु आहे, पण पाकिस्तानला नाही. 

अशी परिस्थीती असताना पाकिस्तानच्या लाहोरमध्ये चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्‍ट्रीचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भारताचे डेप्युटी हाय कमिशनर सुरेश कुमार देखील उपस्थित होते. दशकांपासूनचे वितुष्ट विसरून भारत पाकिस्तानची मदत करू शकेल का, यावर चर्चा करण्यात आली. म्हणूनच तिटकारा असला तरी भारताला या बैठकीत बोलविण्यात आले होते. 

२०१९ पासून दोन्ही देशांमधील व्यापार, संपर्क बंद आहे. दोन्ही देश एकाच वेळी जन्माला आले. पण त्या त्या देशाने आपले भविष्य लिहिले. पाकिस्तानने दहशतवादी पोसले, भारताला युद्धात ढकलले. पण भारताने या सर्वांला सामोरे जात विकासाचे व्हिजन ठेऊन सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण झाला. याचे उदाहरण आता पाकिस्तानला तज्ञ लोक देऊ लागले आहेत. आता अमेरिका, चीन नाही तर भारतच पाकिस्तानला मदत करू शकतो, असेही सल्ले मिळू लागले आहे. पाकिस्तानचे सर्व रस्ते बंद झाल्यावर आता त्यांना भारताची आठवण येऊ लागली आहे. 

भारताला पाकिस्तानशी नेहमीच चांगले संबंध हवे आहेत कारण भूगोल बदलता येत नाही, असे कुमार त्या बैठकीत म्हणाले होते. भारत नेहमीच मध्य आशियातील बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि पाकिस्तान यामध्ये सहकार्य करू शकतो, असे कुमार म्हणाले आहेत. 

भारतासोबत मजबूत व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत, परंतु हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. हे संबंध बिघडवण्यात लष्करानेही सक्रिय भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे. पाकिस्तानात निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यावरच भारतासोबतच्या नव्या व्यापार धोरणाचा निर्णय घेतला जाऊ शकणार आहे. 

Web Title: ...Now enemy India can only help; Advice is also being received from Pakistani media after Lahore Chamber meeting with India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.