आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 09:58 PM2024-09-20T21:58:11+5:302024-09-20T21:59:49+5:30
महत्वाचे म्हणजे, हिजबुल्लाहचा नेता हसन नसराल्लाहने इस्रायलच्या हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत.
मध्यपूर्वेतील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहवर तीन दिवस हल्ले चढवले. यानंतर आता हिजबुल्लाहनेही इस्रायलला प्रत्युत्तर दिले आहे. हिजबुल्लाहने शुक्रवारी उत्तर इस्रायलवर 140 रॉकेट डागले आहेत. महत्वाचे म्हणजे, हिजबुल्लाहचा नेता हसन नसराल्लाहने इस्रायलच्या हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत.
तीन टप्प्यांत डागले रॉकेट -
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, इस्रायली सेन्य आणि दहशतवादी गट हिजबुल्लाह, या दोघांनीही या हल्ल्यांसंदर्भात माहिती दिली आहे. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहिती नुसार, शुक्रवारी दुपारी तीन टप्प्यांत रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यांचे लक्ष लेबनानला लागून असलेल सीमाभागातील ठिकाणे होती. तर, आपण सीमेवरील अनेक ठिकाणांना कत्युशा रॉकेटच्या सहाय्याने लक्ष्य केल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे.
इस्रायली आर्मर्ड ब्रिगेडच्या मुख्यालयालाही करण्यात आले लक्ष्य -
हिजबुल्लाहने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अनेक हवाई संरक्षण तळांना आणि इस्रायली आर्मर्ड ब्रिगेडच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आले. या ठिकाणांवर पहिल्यांदाच हल्ला करण्यात आला आहे. हे रॉकेट दक्षिण लेबनानच्या गावांमध्ये आणि घरांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाटी डागण्यात आले.
गुरवारी इस्रायलनं केली होती बॉम्बिंग -
या घटनेच्या एक दिवस आधीच म्हणजेच गुरुवारीच इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर बॉम्बिंग केली आणि राजधानी बेरूतमध्ये जोरदार स्फोट ऐकू आले. इस्त्रायलने लेबनानच्या हवाई हद्दीत घुसून ही बॉम्बिंग केली. हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरुल्लाह इस्रायलला धमकी देत असताना इस्रायलने हा हवाई हल्ला केला.