CoronaVirus: आता आमची वेळ! अमेरिकेला तेव्हाची मदत आठवली; लसीचा कच्चा माल देण्यास तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 08:03 AM2021-04-26T08:03:13+5:302021-04-26T08:18:44+5:30
America Finally Ready to help India: भारतीय एनएसए अजित डोवाल आणि अमेरिकेचे समकक्ष जेक सुलिवन यांच्यामध्ये रविवारी फोनवर चर्चा झाली. यानंतर अमेरिका आपल्या आडमुठेपणाच्या धोरणावरून मागे हटली आहे. तसेच भारताला सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे सरकार असताना कोरोनाने (Corona Pandemic) कहर केला होता. यावेळी भारताने वेळोवेळी मदत केली होती. मात्र, आता भारतामध्ये कोरोनाने (India) हाहाकार माजविलेला असताना अमेरिकेने (America) मदत करण्यास नकार दिला होता. यामुळे अडचणीत आलेल्या जो बायडेन (joe biden) सरकारने लगेचच यू-टर्न घेत आताचा आमच्या मदतीची वेळ असल्याचे म्हटले आहे. तसेच लस बनविणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी देखील हटविण्याची तयारी दर्शविली आहे. (America finally ready to help India on Corona Pandemic, after Ajit doval call to US NSA.)
भारतीय एनएसए अजित डोवाल आणि अमेरिकेचे समकक्ष जेक सुलिवन यांच्यामध्ये रविवारी फोनवर चर्चा झाली. यानंतर अमेरिका आपल्या आडमुठेपणाच्या धोरणावरून मागे हटली आहे. तसेच भारताला सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली. या दोघांच्या चर्चेनंतर व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या एमिली होर्ने यांनी सांगितले की, अमेरिकेतील हॉस्पिटले कोरोनाच्या सुरुवातीच्या संकटात झगडत होती. तेव्हा भारताने मोठी मदत आम्हाला केली होती. यासारखीच अमेरिकादेखील भारताला या कठीण काळात मदत करण्यासाठी उभा आहे. अमेरिका भारताला रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किट, व्हेंटिलेटर आणि पीपीई किट देणार आहे.
जो बायडेन यांच्या मदतीच्या ट्विटनंतर भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनीदेखील ट्विट करून भारताला गरजेच्या उपकरणांची मदत तातडीने दिली जाणार असल्याचे ट्विट केले आहे.
लशीच्या कच्च्या मालावरील बंदी अमेरिका हटवणार
अमेरिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर, बायडेन प्रशासन कोरोना लशीच्या निर्यातीत वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातीवर घातलेली बंदी हटवू शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांच्यासोबत लशीच्या कच्च्या मालासंदर्भात चर्चा केली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनीही अमेरिकेचे उप सचिव वेंडी शेरमन यांच्यासोबत ही बंदी हटविण्यासंदर्भात चर्चा केली आहे.
Just as India sent assistance to the United States as our hospitals were strained early in the pandemic, we are determined to help India in its time of need. https://t.co/SzWRj0eP3y
— President Biden (@POTUS) April 25, 2021
रशियाचा मदतीचा हात -
सध्या भारतात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हाहाकार माजला आहे. यातच, रशियाने भारताला कोरोना संकटाचा सामना करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत रशियाकडून ऑक्सीजन काँसंट्रेटर्स आणि टँक विकत घेण्याचा विचार करत आहे. जर हा प्लॅन आमलात आलाच तर सध्या ऑक्सिजन संकटाचा सामना करत असलेल्या भारताला मोठा दिलासा मिळेल.
चीननेही दिलाय मदतीचा प्रस्ताव -
तत्पूर्वी, चीननेही भारताला कोरोनाचा सामना करण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी भारताला मेडिकल सप्लाय करण्यास तयार आहोत, असे चीनने गुरुवारी म्हटले होते. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे भारतातील मेडिकल ढांचा कमकूवत होऊ लागला आहे. भारतातील महामारीच्या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेनबिन यांनी म्हटले होते, की चीन मदतीसाठी तयार आहे. कोरोना व्हायरस हा मानवतेचा शत्रू आहे. त्याचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्रित येण्याची आवश्यकता आहे.