आता जस्टिन ट्रुडोंनी स्वस्तिकविरोधात गरळ ओकली; कॅनडात बॅन करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 01:23 PM2023-11-06T13:23:56+5:302023-11-06T13:24:23+5:30

कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेच्या प्रतीकावर बंदी घालण्याचा कॅनडा सरकारचा विचार आहे. यासंदर्भात एक विधेयकही आणण्यात आले असून, ते सध्या रखडले आहे.

Now Justin Trudeau takes issue against Swastika; Preparing to ban in Canada | आता जस्टिन ट्रुडोंनी स्वस्तिकविरोधात गरळ ओकली; कॅनडात बॅन करण्याची तयारी

आता जस्टिन ट्रुडोंनी स्वस्तिकविरोधात गरळ ओकली; कॅनडात बॅन करण्याची तयारी

जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा भारताची नाराजी ओढवून घेण्याची तयारी केलेली आहे. नवा वाद स्वस्तिक चिन्हावरून सुरु होण्य़ाची शक्यता आहे. द्वेष भडकवणारे असे प्रतीक ते संसदेत दाखवू देऊ शकत नाहीत, असे त्यांनी सोशल प्लेटफॉर्म एक्सवर म्हटले आहे. 

कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेच्या प्रतीकावर बंदी घालण्याचा कॅनडा सरकारचा विचार आहे. यासंदर्भात एक विधेयकही आणण्यात आले असून, ते सध्या रखडले आहे. स्वस्तिकचा द्वेषाशी काहीही संबंध नाही, तरीही पाश्चिमात्य देश वारंवार त्याच्याशी जोडत आहेत. 

न्यू डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ कॅनडाने २०२२ मध्ये द्वेषयुक्त प्रतीकांवर एक विधेयक आणण्याचा प्रयत्न केला होता. या यादीत अशी अनेक चिन्हे होती, ज्यांच्या अनुयायांनी निरपराध लोकांवर अत्याचार केले होते. कू-क्लक्स-क्लान ग्रुप प्रमाणे एकेकाळी अमेरिका आणि युरोपमध्ये सक्रिय होता. हा गट कृष्णवर्णीयांना मारहाण करायचा. या गटाच्या चिन्हासह अनेक चिन्हे यामध्ये होती. 

द्वेष पसरवणाऱ्या प्रतीकांमध्ये स्वस्तिकचाही समावेश करण्यात आला होता. यामुळे 8 लाखांहून अधिक ज्यूंना आपले प्राण गमवावे लागल्याचे सांगण्यात आले होते. ज्यूंच्या हत्येसाठी नाझी पक्ष जबाबदार होता, त्यांचे चिन्ह काहीसे स्वस्तिकसारखे आहे. यामुळे पाश्चात्य लोक स्वस्तिक चिन्हावर दुख धरून आहेत. पाश्चिमात्य देशांनी जाणूनबुजून हिंदूंचे हे प्रतीक हिटलरशी जोडण्यास सुरुवात केली आहे. भारताने वारंवार आक्षेप व्यक्त करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता ट्रूडो यांनी थेट स्वस्तिक म्हटले आहे, तर नाझी चिन्हाला हॅकेनक्रेझ म्हटले जाते. 
 

Web Title: Now Justin Trudeau takes issue against Swastika; Preparing to ban in Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.