इसिसचा आता अफगाण प्रवेश तालिबानींना सुरुंग
By admin | Published: July 1, 2015 02:27 AM2015-07-01T02:27:59+5:302015-07-01T02:27:59+5:30
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया अर्थात इसिसने अफगाणिस्तानातील काही प्रदेशावर प्रथमच ताबा मिळविला आहे. तालिबान्यांचा पराभव करीत ही कुरघोडी करणाऱ्या इसिसच्या प्रवेशामुळे तालिबान्यांच्या
सुुर्ख देवल : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया अर्थात इसिसने अफगाणिस्तानातील काही प्रदेशावर प्रथमच ताबा मिळविला आहे. तालिबान्यांचा पराभव करीत ही कुरघोडी करणाऱ्या इसिसच्या प्रवेशामुळे तालिबान्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे.
नानगऱ्हा प्रांतातून सुरक्षिततेच्या कारणास्तव पलायन केलेल्या नागरिकांनी सांगितले, की तालिबानविरुद्धच्या मोहिमेत इसिसचे शेकडो दहशतवादी सामील झाले होते. या भागातील अफूच्या शेतीला आग लावून देत इसिसने तालिबानच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या दिशेने कूच केले. अफूच्या शेतीतून मिळणाऱ्या पैशांच्या माध्यमातून तालिबान अफगाण सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्नशील असते. या प्रांताच्या मोठ्या भूभागावर इसिसने ताबा मिळविला आहे.
इसिसचे सदस्य मोठमोठ्या ट्रकमधून येथे आले. त्यांनी स्वयंचलित बंदुकीने तालिबान्यांवर बेछूट गोळीबार केला. याचा तालिबान्यांनी प्रतिकार न करता पलायन केले, अशी माहिती स्थानिक आदिवासी नेत्याने दिली.