आता पाकिस्तानने केला 'कोहिनूर' हि-यावर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2016 09:10 AM2016-02-10T09:10:21+5:302016-02-10T12:15:56+5:30

१०५ कॅरेट्सचा कोहिनूर हिरा पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रांताचा भाग असल्यावने तो पाकिस्तानमधअये परत आणावा अशी मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयाने स्वीकारली.

Now Pakistan has claimed 'Kohinoor' | आता पाकिस्तानने केला 'कोहिनूर' हि-यावर दावा

आता पाकिस्तानने केला 'कोहिनूर' हि-यावर दावा

Next
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. १० - ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मुकुटातील 'कोहिनूर हिरा' पाकिस्तानत परत आणण्यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयाने स्वीकारली असून आता पाकिस्ताननेही या 'हि-यावर' दावा केला आहे. याच ' कोहिनीर हिऱ्या'साठी गेल्या कित्येक वर्षांपासून भारत सरकारकडूनदेखील प्रयत्नसुरू आहेत.
बॅरिस्टर जावेद इक्बाल जाफरी यांनी याप्रकरणी याचिका दाखल करत दस्तुरखुद्द महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासह पाकिस्तानमधील ब्रिटिश उच्चायुक्तालयाला प्रतिवादी केले होते. १०५ कॅरेट्सचा हा हिरा पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रांताचा भाग होता, त्या न्यायाने त्याची मालकी आता पाकिस्तानकडेच असली पाहिजे, असा युक्तिवाद जाफरी यांनी केला होता. मात्र ब्रिटनच्या राणीविरोधातील प्रकरणाची सुनावणी घेणे न्यायालयाच्या कक्षेत येत नसल्याचे सांगत न्यायालयाच्या निबंधकांनी ही याचिका दाखल करून घेण्यास आक्षेप नोंदवला होता. पण लाहोर उच्चन्यायालयाचे न्या. खालीद महमूद खान ते आक्षेप फेटाळत ती याचिका दाखल करून घेण्याचे आदेश दिले.
जर ब्रिटनमध्ये राणीला एखाद्या प्रकरणात प्रतिवादी बनविण्यात अडसर येत नसेल, तर पाकिस्तानातील प्रकरणातही त्यांना प्रतिवादी का बनवता येणार नाही?  असा सवाल विचारत आपली याचिका दाखल करून घ्यावी अशी मागणी जाफरी यांनी केली होती. 
ब्रिटीशांनी पंजाबचे महाराजा रणजितसिंह यांचे नातू दलिपसिंह यांच्याकडून जबरदस्तीने हा हिरा बळकावून त्यांच्या देशात नेला. महाराणी एलिझाबेथ यांचा त्या हि-यावर कोणताही अधिकार नसून तो पाकिस्तानला परत मिळावा, असेही जाफरी यांनी याचिकेत म्हटले आहे. १९५३ साली राज्यारोहण समारंभात १०५ कॅरट वजनाचा कोहिनूर हिरा राणी एलिझाबेथ यांच्या मुकुटात विराजमान झाला होता.

 

Web Title: Now Pakistan has claimed 'Kohinoor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.