आता विमानातूनही होणार उभ्याने प्रवास! कोलंबियन एअरलाइन्सची योजना
By admin | Published: July 3, 2017 04:08 AM2017-07-03T04:08:21+5:302017-07-03T04:08:21+5:30
बस, लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये तसेच खाजगी वाहनांमधून प्रवाशांनी उभ्यांनी प्रवास करणे नित्याचेच. पण आता
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - बस, लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये तसेच खाजगी वाहनांमधून प्रवाशांनी उभ्यांनी प्रवास करणे नित्याचेच. पण आता विमानामधूनही प्रवासी उभे राहून प्रवास करताना दिसण्याची शक्यता आहे. कोलंबिया एअरलाइन्स नावाच्या विमान कंपनीने तशी योजनाच आखली आहे. प्रवाशांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा यासाठी या विमान कंपनीने आपल्या विमानामधून आसनव्यवस्था काढून टाकण्याचा विचार सुरू केला आहे. उभ्याने प्रवास केल्याने अधिक प्रवाशी विमानातून प्रवास करू शकतील, आणि अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याने साहजिकपणे विमानाच्या तिकिटांचे दर कमी होतील, असा कंपनीचा कायास आहे.
स्वस्तात विमान प्रवासाची सेवा देणारी व्हिवा कोलंबिया ही कंपनी आपल्या विमानांमधून पारंपरिक आसनव्यवस्था काढून टाकण्याच्या विचारात आहे. याबाबत माहिती देताना व्हिवा कोलंबियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम शॉ म्हणाले, आमची विमान कंपनी विमानातून उभ्यानी प्रवास करता येण्याच्या पर्यायाचा अभ्यास करत आहे. आम्ही उभ्यांनी प्रवास करण्याविषयी लोकांना विचारले असता त्यांनी स्वस्तात प्रवास होण्यासाठी आपण काहीही करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.
देशातील वाढत्या प्रवासी संख्येचा फायदा घेण्यासाठी आम्ही 50 नवीन 320 एअरबस खरेदी करणार असल्याचे सांगितले होते. तसेच जास्तीत जास्त प्रवासी आणि कमीत कमी प्रवास भाड्यात प्रवास घडवण्याची सुरुवात पुढील वर्षी करणार असल्याचेही नो-फ्रिल कॅरियर या कंपनीने सांगितले आहे.
मात्र प्रवाशांना उभ्यांनी विमान प्रवास घडवण्याची योजना काही नवी नाही. याआधी 2003 साली एअरबसने प्रवाशांसाठी उभ्या सीटची व्यवस्था करण्याची कल्पना मांडली होती. तसेच रायनियर कंपनीनेही 2010 साली अशी कल्पना मांडली होती. पण नागरी हवाई वाहतूक व्यवस्थापनाने प्रवाशांसाठी उभ्या सीट आणण्याच्या कल्पनेला अद्याप मान्यता दिलेली नाही. तसेच कुठल्याही देशाच्या विमान वाहतूक प्रशासनांनीही या कल्पनेला मान्यता दिलेली नाही.