आश्चर्यम्..! आता गायीच्या शेणानं आकाशात झेपावणार रॉकेट! पहिल्यांदाच इंजीनमध्ये दिसली LBMची कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 02:54 PM2023-12-16T14:54:30+5:302023-12-16T14:55:50+5:30
जपानमधील अभियंत्यांनी गायीच्या शेणापासून मिळणाऱ्या लिक्विड बायो मिथेनवर चालणाऱ्या एका नवीन प्रकारच्या रॉकेट इंजीनचे परीक्षण केले आहे...
आतापर्यंत गायीच्या शेणाचा वापर केवळ, खत, स्वयंपाकाचा गॅस आणि विविध धार्मिक विधीं यांसारख्या कामांतच होत होता. मात्र आता याचा वापर रॉकेटला अवकाशात पाठवण्यासाठीही केला जाऊ शकतो. जपानमधील अभियंत्यांनी गायीच्या शेणापासून मिळणाऱ्या लिक्विड बायो मिथेनवर चालणाऱ्या एका नवीन प्रकारच्या रॉकेट इंजीनचे परीक्षण केले आहे. यामुळे अधिक टिकाऊ प्रोपेलेंट विकसित होऊ शकते.
यासंदर्भात माहिती देताना स्टार्टअप इंटरस्टेलर टेक्नोलॉजीज इंकने (IST) एका निवेदनात म्हटले आहे की, रॉकेट इंजीनची, ज्याला झिरो म्हटले जाते, जापानमधील होक्काइडो स्पेसपोर्टमध्ये 10 सेकंदांपर्यंत "स्टॅटिक फायर टेस्ट" करण्यात आली. कंपनीने म्हटले आहे की, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल म्हणजेच झिरो हे लिक्विड बायो मिथेनवर (LBM) चालते. बायोमिथेन प्राण्यांच्या शेणापासून मिळते. हे कंपनीला होक्काइडो येथील डेअरी फार्ममधून मिळते.
IST ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रॉकेट इंजीनच्या परीक्षणाचे फुटेजही शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये इंजून चालू झाल्याचे दिसत आहे आणि त्यातून आकाशी निळ्या रंगाची आग निघतानाही दिसत आहे.
🚀News: Our small satellite launch vehicle, ZERO, just aced a milestone with a Liquid Biomethane-powered static fire test!
— Interstellar Technologies (@istellartech_en) December 7, 2023
This achievement mirrors ESA's success with an LBM-fueled rocket engine, marking a private rocket company world-first!🔥
Read more :https://t.co/5B3Yt3C4eQpic.twitter.com/x5yDujx9DQ
कसे तयार केले जाते एलबीएम इंधन? -
कंपनी म्हटले आहे की, युरोपीय अतंराळ संस्थेने (ESA) अशा प्रकारचे रॉकेट इंजीन विकसित केल्यानंतर, एखाद्या खासगी कंपनीने पहिल्यांदाच अशा प्रकारचे LBM ईंधन तयार केले आहे. महत्वाचे म्हणजे, रॉकेट इंजीन सायन्सच्या विकासात हा एक मैलाचा दगड असल्याचे म्हणत, जगात असे पहिल्यांदाच घडले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच, एलबीएम इंधन हे बायोगॅसचा मुख्य घटक असलेल्या मिथेनला वेगळे आणि शुद्ध करून, तसेच जवळपास 160 अंश सेल्सिअसवर द्रवीकरण करून तयार केले जाते. असेही कंपनीने म्हटले आहे.