आता हेच ऐकायचं बाकी होतं; चक्क विमानातही उभ्याने प्रवास करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 03:52 PM2019-06-21T15:52:32+5:302019-06-21T16:06:42+5:30
इटालियन एव्हिएशन इंटीरियर कंपनीने विमानातील स्पेस वाढविण्यासाठी एक भन्नाट आयडीया शोधून काढली आहे.
नवी दिल्ली - सध्या लोकसंख्या इतकी वाढली आहे की त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या साधनसुविधा अपुऱ्या पडत आहेत. रेल्वे असो वा बस, कोणतंही सार्वजनिक ठिकाण म्हटलं तर आपल्याला गर्दीची सवय झालेली पाहायला मिळते. रेल्वेत बसायला जागा मिळाली नाही तर उभं तरी राहायला जागा मिळावी अशी इच्छा असते. पण तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य होईल की आता विमानतही उभ्याने प्रवास करता येणार आहे.
इटालियन एव्हिएशन इंटीरियर कंपनीने विमानातील स्पेस वाढविण्यासाठी एक भन्नाट आयडीया शोधून काढली आहे. या सीट्समुळे विमान प्रवासाचे दर कमी होतील आणि तुमचा प्रवास जलदगतीने करता येईल. या खुर्च्यांची रचना अशाप्रकारे केली आहे की, तुम्ही उभं राहून प्रवास करत असला तरी तुम्हाला याचा कंटाळा येणार नाही.
इटालियन एव्हिएशन इंटीरियर कंपनीने स्काय रायडर खुर्ची पहिल्यांदा 2010 मध्ये लॉन्च करण्यात आली. पण कोणत्याही विमान वाहतूक कंपन्यांनी याची खरेदी केली नाही. कंपनीने 2019 मध्ये पुन्हा आधुनिक व्हर्जनने स्काय रायडर 3.0 चेअर्स लॉन्च केली आहे. अद्याप विमान वाहतूक कंपन्यानी याची खरेदी केली नाही.
या स्काय रायडर खुर्च्यांमुळे विमानाच्या इकोनॉमी क्लासमधील प्रवाशांची संख्या वाढू शकते. प्रवाशी संख्या वाढली तर विमानाचे दर सर्वसामान्यांना परवडतील अशाप्रकारे होतील असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. विमानात या खुर्च्या लावणं कितपत फायदेशीर ठरेल हे प्रश्नचिन्ह आहे. तसेच अशा खुर्च्यामुळे प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येईल हे नाकारता येणार नाही.
What fresh hell is this for budget airline passengers? #PAS19#avgeekpic.twitter.com/0OOHowC0BI
— Tim Robinson (@RAeSTimR) June 19, 2019
जर समजा भविष्यात अशा खुर्च्या विमानात बसवल्या गेल्या तर कमी अंतराच्या प्रवासासाठी या फायदेशीर ठरु शकतील. विमानातील बसण्याचा स्पेस वाढला तर त्याचा उपयोग प्रवासी संख्या वाढविण्यासाठी होईल. कमी खर्चात विमान प्रवास केला जाऊ शकेल. सध्या विमानातील दोन खुर्च्यामधील अंतर 23 इंच असेल तर या खुर्च्या लावल्या तर तेच अंतर 7 इंच होऊ शकेल.
I present to you the "skyrider" airplane seat. It's an innovation I do not need. pic.twitter.com/KRV4PgLa7I
— Rodney Myers (@_RodneyMyers) June 20, 2019
स्काय रायडर खुर्च्या बसविण्याचा तोटा
तीन-चार प्रवास करायचा झाला तर त्याचा त्रास होईल
संपूर्ण प्रवासात तुमच्या शरीराचं वजन तुमच्या पायांवर येईल. त्यामुळे पायांत वात येण्याची शक्यता आहे.