आता काश्मीरच्या मुद्द्यावर दखल देणार- चीन

By admin | Published: May 2, 2017 03:47 PM2017-05-02T15:47:14+5:302017-05-02T16:17:13+5:30

भारताच्या दबावानंतरही आम्ही चीन-पाक इकोनॉमिक कॉरिडॉर(सीपीईसी)मध्ये गुंतवणूक केली आहे.

Now will interfere with the Kashmir issue- China | आता काश्मीरच्या मुद्द्यावर दखल देणार- चीन

आता काश्मीरच्या मुद्द्यावर दखल देणार- चीन

Next

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 2 - भारताच्या दबावानंतरही आम्ही चीन-पाक इकोनॉमिक कॉरिडोर(सीपीईसी)मध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे कॉरिडोरच्या माध्यमातून काश्मीरही आता बीजिंगशी जोडला जाणार आहे. आम्हाला काश्मीर मुद्द्यात हस्तक्षेप करत इकोनॉमिक कॉरिडोरमध्ये गुंतवणूक वाढवायची आहे, असं वृत्त चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून छापून आलं आहे. तसेच आमचे काही ऑफिसर हे दलाई लामांना फंडिंग करत असल्याचा खुलासाही चीननं केला आहे.

काश्मीरच्या मुद्द्यावर चीनला मध्यस्थता करण्याची इच्छा आहे. हे आमचं दीर्घकालीन धोरण असल्याचंही चीननं सांगितलं आहे. वन बेल्ट वन रोड प्रोजेक्टच्या माध्यमातून चीनला काश्मीरसह प्रादेशिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी भारताच्या मदतीची आवश्यकता आहे. OBOR हा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीनला यूरोपशी जोडण्याचा शी जिनपिंग यांचा मानस आहे. चीन-पाकिस्तान(सीपीईसी) हा आर्थिक कॉरिडॉरसुद्धा या प्रकल्पाचाच एक हिस्सा आहे. OBOR या प्रोजेक्टच्या माध्यमातून सहभागी देशांचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. आम्हाला वाटतं भारतानं या प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊन महत्त्वाची भूमिका बजावावी, असंही चीननं याआधी सांगितलं होतं.

या OBOR या समीटमध्ये 28 देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान सहभागी होणार आहेत. 46 अब्ज डॉलरच्या सीपीईसी या कॉरिडॉरचा भारताच्या राजनैतिक आणि काश्मीर सीमावादाशी सरळ कोणताही संबंध नाही. या प्रकल्प फक्त आर्थिक सहकार आणि विकासासाठी आहे. काश्मीर मुद्द्यावर चीनच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असंही चीननं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. मात्र आता चीनला काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थता करण्याची इच्छा आहे. OBOR प्रोजेक्टमध्ये भारतानं सहभाग नोंदवल्यास यातून अनेक मार्ग खुले होणार आहेत. बांगलादेश, चीन, भारत आणि म्यानमार हे देश या समीटचाच भाग आहेत. त्यामुळे भारत यासाठी सकारात्मक भूमिका बजावू शकतो, असंही चीन म्हणाला होता.

Web Title: Now will interfere with the Kashmir issue- China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.