आता मेसेज ‘अनसेंड’ करणे शक्य!

By admin | Published: March 29, 2015 01:29 AM2015-03-29T01:29:54+5:302015-03-29T01:29:54+5:30

बऱ्याच वेळा सोशल मीडियावर टाकलेला मेसेज अथवा पाठविलेला एसएमएस मुळात पाठविलाच नसता तर बरे झाले

Now you can unzend the message! | आता मेसेज ‘अनसेंड’ करणे शक्य!

आता मेसेज ‘अनसेंड’ करणे शक्य!

Next

वॉशिंग्टन : बऱ्याच वेळा सोशल मीडियावर टाकलेला मेसेज अथवा पाठविलेला एसएमएस मुळात पाठविलाच नसता तर बरे झाले
असते अथवा निदान एखाद्या ठराविक व्यक्तीला तरी निदान तो मेसेस पाठवायला नको होता, अशी पश्चातबुद्धी आपल्याला
होते.
पण या मेसेजेसचं धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखं असतं व एकदा पाठविला की तो पुन्हा मागे घेता येत नाही, म्हणून आपण हळहळत बसतो. पण आता न्यूयॉर्कमधील एका
कंपनीने पाठविलेला मेसेज
‘अनसेंड’ करण्याचे आणि तो ज्याला मिळाला असेल त्याच्या स्मार्टफोनवरूनही तो कायमचा पुसून टाकण्याचे एक नवे ‘अ‍ॅप’ विकसित केले आहे.
फंङएट असे या अ‍ॅपचे नाव असून त्यामुळे नको असलेला मेसेज ज्या संवादसाधनावरून (डिव्हाईस) पाठविला त्यावरून व ज्यावर मिळाला असेल अशा दोन्ही ठिकाणांहून पुसून टाकता येतो.
या अ‍ॅपमुळे इन्स्टंट मेसेजिंग, फाईल, इमेज अ‍ॅण्ड लोकेशन शेअरिंग, व्हॉईस अ‍ॅण्ड व्हीडिओ कॉलिंग या सर्वांना चिरेबंदी ‘प्रायव्हसी’चे कवच मिळू शकते, असाही या कंपनीचा दावा आहे.
लोकांच्या आग्रहामुळे
न्यूयॉर्कमधील राकेतू (फं‘ी३४) कंपनीने हे अ‍ॅप विकसित केले आहे. कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग पार्कर म्हणाले की, संदेशवहनातील गोपनीयतेवर अतिक्रमणे झाल्याच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत असताना आपण पाठवीत असलेले संदेश पूर्णपणे खासगी व सुरक्षित राहतील याविषयी लोक आता अधिक आग्रही होऊ लागले आहे. यातूनच हे अ‍ॅप तयार केले गेले आहे.
(वृत्तसंस्था)

च्पार्कर म्हणाले की, हे अ‍ॅप विरुद्ध अर्थानेही सुरक्षिततेची हमी देते. म्हणजे या अ‍ॅपने नको असलेला मेसेज पाठविणाऱ्याच्या व प्राप्त करणाऱ्याच्या अशा दोघांच्याही ‘डिव्हाईस’वरून पूर्णपणे पुसला जात असल्याने अशा नकोशा मेसेजचा कुठे मागमूसही न राहण्याची खात्री मिळते.

च्हे अ‍ॅप स्वर्हरविना थेट डिव्हाईस टू डिव्हाईस तंत्रज्ञानावर आधारित असल्याने असा ‘अनसेंड’ केलेला मेसेज डेटा स्टोअरेज किंवा डेटा मायनिंगनेही पुन्हा प्राप्त केला जाऊ शकत नाही, असे पार्कर म्हणाले. यामुळे वापरकर्त्याच्या डेटाला अत्युच्य प्रायव्हसी व सुरक्षितता मिळते.

Web Title: Now you can unzend the message!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.