Twitter: आता ट्विटरवरूनही मिळणार पैसे, अनेक युझर्सना करण्यात आलं लाखोंचं पेमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 04:16 PM2023-07-14T16:16:25+5:302023-07-14T16:16:41+5:30

Twitter: सोशट मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवरूनही क्रिएटर्सना आता चांगली कमाई करता येणार आहे. ट्विटरने क्रिएटर्ससाठी नवा अॅड रेव्हेन्यू शेअरिंग प्रोग्रॅम सुरू केला आहे.

Now you will get money from Twitter too, many users have been paid lakhs of rupees | Twitter: आता ट्विटरवरूनही मिळणार पैसे, अनेक युझर्सना करण्यात आलं लाखोंचं पेमेंट

Twitter: आता ट्विटरवरूनही मिळणार पैसे, अनेक युझर्सना करण्यात आलं लाखोंचं पेमेंट

googlenewsNext

सोशट मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवरूनही क्रिएटर्सना आता चांगली कमाई करता येणार आहे. ट्विटरने क्रिएटर्ससाठी नवा अॅड रेव्हेन्यू शेअरिंग प्रोग्रॅम सुरू केला आहे. या प्रोग्रॅममधून क्रिएटर्सना टत्यांच्या पोस्टच्या रिप्लायपासून सुरू होणाऱ्या अॅड रेव्हेन्यूमध्ये भागीदारी मिळेल. ट्विटरवर आपलं काम शेअर करणाऱ्या आणि फॉलोअर्सशी संपर्क ठेऊ इच्छिणाऱ्या  क्रिएटर्ससाठी ही एक चांगली संधी आहे. या प्रोग्रँममुळे क्रिएटर्सना आपल्या कामा व्यावसायिक रूप देण्यासाठी आणि त्यामाध्यमातून पैसे कमावण्यासाठी एक चांगला मार्ग मिळणार आहे.

रेव्हेन्यू शेअरिंगला समाविष्ट करण्यासाठी ट्विटर आपल्या क्रिएटर मॉनिटायझेशनचा विस्तार करत आहे. त्याचा अर्थ क्रिएटर्सना त्यांच्या पोस्टवरील रिप्लायमधून सुरू होणाऱ्या जाहिरातीमध्ये ठराविक भाग मिळू शकेल. त्यामाध्यमातून लोकांना थेट ट्विटरवरून पैसे कमावण्यास मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ट्विटरकडून सांगण्यात आलं. 

एका ट्विटमधून समोर आलेल्या माहितीनुसार लोकप्रिय यूट्युबर मिस्टर बीस्ट (जेम्स डोनाल्डसन) याने अॅर रेव्हेन्यू शेअरिंगचा भाग म्हणून ट्विटच्या माध्यमातून २१ लाख रुपये कमाई केली. तर अनेक युझर्सना कंझ्मशन म्हणून ५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली.

हा कार्यक्रम स्ट्राइप पेआऊट्सला सपोर्ट करणाऱ्या सर्व देशांमध्ये उपलब्ध आहे. याबाबत ट्विटरने सांगितले की, आम्ही इनिशियल ग्रुपची सुरुवात करत आहोत. तिथे पेमेंट एक्सेप्ट करण्यासाठी निमंत्रित करण्यात येईल. दरम्यान, मस्क यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, एक्स/ट्विटर क्रिएटर्सना त्यांच्या रिप्लायमध्ये दाखवण्यात आलेल्या अॅड्ससाठी पैसे देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. पहिलं ब्लॉक पेमेंट  ५ मिलियन डॉलर एवढं आहे.  

Web Title: Now you will get money from Twitter too, many users have been paid lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.