ना'पाक' इरादा, दहशतवादी मसूद अजहरचा भारताविरुद्ध नवा कट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 08:32 AM2018-07-19T08:32:56+5:302018-07-19T08:39:07+5:30
भारताविरुद्ध पाकिस्तानचे कटकारस्थान अद्यापही सुरुच असल्याचे दिसते. आता, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याची एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे.
नवी दिल्ली - भारताविरुद्ध पाकिस्तानचे कटकारस्थान अद्यापही सुरुच असल्याचे दिसते. आता, पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याची एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे. त्यामधून, मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांची फौज तयार करुन समुद्रामार्गे हल्ले करण्यासाठी पाठविण्याचा कट रचण्यात येत असल्याचे समजते.
दहशतवादी मसूद अजहरच्या या टेपमध्ये मुस्लीम तरुणांना भडकविण्यात येत असल्याचे दिसून आहे. तसेच पोहायला शिकून समुद्रामार्गे जिहाद सुरु करण्याचे सांगण्यात येत आहे. पोहणे हा एक हुनर आहे. जिहाद, ताकद आणि सन्मानासाठी हा हुनर शिकणे गरजेचे आहे. जर मुस्लिमांनी पाण्यालाच आपला मित्र बनवायला हवे. ऑडिओतील मसूद अजहरच्या संवादानुसार, आगामी काळात एक लाख मुस्लीम तरुणांना पोहण्यात तरबेज करण्यात येणार आहे. हिवाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच एक लाख तरुणांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून याची जबाबदारी अजहरने स्वत: घेतली आहे. तसेच कशारितीने पोहायला हवे, असेही मसूदने या टेपमध्ये सांगितल्याचे ऐकायला मिळत आहे.