चीनमध्ये स्फोटातील मृतांची संख्या ४७
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 06:21 AM2019-03-23T06:21:22+5:302019-03-23T06:21:40+5:30
चीनमध्ये एका रासायनिक प्रकल्पात स्फोट होऊन मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ४७ झाली आहे. तपास आणि मदत अभियानातून शक्य ते प्रयत्न करण्याचे निर्देश राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत.
बीजिंग : चीनमध्ये एका रासायनिक प्रकल्पात स्फोट होऊन मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ४७ झाली आहे. तपास आणि मदत अभियानातून शक्य ते प्रयत्न करण्याचे निर्देश राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत.
काऊंटीच्या सरकारने सांगितले की, जियांग्सूप्रांताच्या यांगचेंगमध्ये एका रासायनिक औद्योगिक वसाहतीत फर्टिलायझर फॅक्ट्रीमध्ये गुरुवारी आग लागून मोठा स्फोट झाला. सरकारी वृत्तपत्र चायना डेलीच्या वृत्तानुसार यात ४७ जणांचा मृत्यू झाला, तर ९० नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रपती आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव शी जिनपिंग यांनी तपास मोहिमेत सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. युरोपच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर गेलेल्या शी जिनपिंग यांनी मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.