भूकंपबळींची संख्या २७२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2016 03:25 AM2016-04-19T03:25:47+5:302016-04-19T03:25:47+5:30
इक्वाडोरमधील भूकंपबळींची संख्या २७२ वर गेली आहे, तथापि, हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.
Next
पोर्तोव्हिजो : इक्वाडोरमधील भूकंपबळींची संख्या २७२ वर गेली आहे, तथापि, हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.
या दक्षिण अमेरिकी देशाला रविवारी ७.८ तीव्रतेचा धक्का बसल्यानंतर किनारपट्टीतील अनेक शहरांत मोठा विध्वंस घडून आला. भूकंप व त्यानंतरच्या अनेक धक्क्यांनी घरे, इमारती कोसळून दोन हजार लोक जखमी झाले. बचाव पथके जिवंत लोकांना बाहेर काढण्यासाठी संघर्ष करीत आहेत. प्रशांत किनारपट्टीतील विध्वंस एवढा प्रचंड आहे की, कोलंबिया, मेक्सिको व अल-साल्वाडोर या शेजारील देशांना मदत पथके पाठवावी लागली. (वृत्तसंस्था)