इंटरनेटधारकांची संख्या वर्षअखेरीस ३ अब्ज - संयुक्त राष्ट्र
By admin | Published: May 7, 2014 06:18 AM2014-05-07T06:18:29+5:302014-05-07T06:40:30+5:30
जगात इंटरनेट वापरणार्यांची संख्या २०१४ च्या अखेरपर्यंत तीन अब्ज होईल, तसेच मोबाईलधारकांची संख्याही वाढून सात अब्जाच्या घरात जाणार आहे.
Next
>संयुक्त राष्ट्र : जगात इंटरनेट वापरणार्यांची संख्या २०१४ च्या अखेरपर्यंत तीन अब्ज होईल, तसेच मोबाईलधारकांची संख्याही वाढून सात अब्जाच्या घरात जाणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
२०१४ च्या अखेरपर्यंत जगात ४४ टक्के घरांमध्ये इंटरनेट जोडणी असेल, असे संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने (आयटीयू) आपल्या एका अहवालात म्हटले आहे. विकसनशील देशांच्या एकतृतियांश (३१ टक्के) घरांमध्ये इंटरनेट कनेक्शन असतील, तर विकसित देशांमध्ये ही संख्या ७८ टक्के असेल. विकसनशील देशांमध्ये कौटुंबिक स्तरावर इंटरनेट पोहोचण्याचे प्रमाण सध्या टिपेला आहे. इंटरनेटप्रमाणेच मोबाईलचा वापरही वाढत असून या वर्षअखेरीस मोबाईलधारकांची संख्या सात अब्ज होईल आणि यात आशिया-प्रशांत क्षेत्राचे योगदान ३.६ अब्ज एवढे असेल.
ही वाढ मुख्यत्वे विकसनशील देशांतील आर्थिक वृद्धीमुळे होत आहे. या देशांचे जागतिक स्तरावर मोबाईल जोडणीतील योगदान तब्बल ७८ टक्के होईल.
माहिती आणि तंत्रज्ञानाशी संबंधित नव्या आकडेवारीतून माहिती आणि तंत्रज्ञान समाजाचा मुख्य प्रेरक म्हणून कायम राहील हे स्पष्ट होते, आयटीयूचे सरचिटणीस हॅमाडून टूर यांनी सांगितले.