पांडांची संख्या वाढतेय, प्रथमच समोर आले ३६ नवजात,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:06 AM2017-10-17T01:06:26+5:302017-10-17T01:07:19+5:30
वेगवेगळ्या वयोगटातील ३६ छोट्या छोट्या पांडांनी शुक्रवारी चीनच्या संवर्धन आणि संशोधन केंद्रात पदार्पण केलं आहे. या पांडांना या निमित्ताने प्रथमच जगासमोर आणलं गेलं.
बिजिंग : वेगवेगळ्या वयोगटातील ३६ छोट्या छोट्या पांडांनी शुक्रवारी चीनच्या संवर्धन आणि संशोधन केंद्रात पदार्पण केलं आहे. या पांडांना या निमित्ताने प्रथमच जगासमोर आणलं गेलं.
सिचुआन प्रांतात या पांडांना पकडलं होतं. चीनमध्ये पांडांच्या घटणाºया संख्येनंतर चीनने १९९५ मध्ये प्रजनन कार्यक्रम हाती घेतला आहे. यावर्षी संवर्धन आणि संशोधन केंद्रात ४२ पांडांचा जन्म झाला. हे सर्व पांडा एकाच वर्षी जन्मले आहेत. या प्रजनन कार्यक्रमात अनेक आव्हानं आहेत. असं आढळून आलं आहे की, २० टक्के मादीच पांडांना जन्म देण्यासाठी सक्षम असतात. उर्वरित ८० टक्के मादींमध्ये निरोगी अंडी देण्यात समस्या आहेत.
जन्म देण्याचं हे चक्र वर्षातून एकदाच वसंत ऋतुमध्ये असतं. यातील २ ते ७ दिवसच महत्त्वाचे असतात आणि त्यातील २४ ते ३६ तास फलदायक असतात. बहुतांश पांडा नैसर्गिक सोबत करण्यातील स्वारस्य हरवून बसल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आलं आहे. ‘जागतिक वन्यजीव संघटनां’साठी पांडांची वाढती उपस्थिती दिलासा देणारी आहे. एका दशकात पांडांची संख्या १७ टक्क्यांनी वाढली आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे त्यांच्या जगण्याचा दर वाढला आहे. हे बेबी पांडा सध्या नाजूक असून त्यांची खूप काळजी घेणं गरजेचं आहे.