हिमवादळातील बळींची संख्या २५
By admin | Published: January 26, 2016 02:22 AM2016-01-26T02:22:52+5:302016-01-26T02:22:52+5:30
अमेरिकेत स्नोजिला या हिमवादळाने कहर केला असून यातील बळींची संख्या २५ वर पोहोचली आहे. रस्त्यांवर आणि ठिकठिकाणी बर्फ साठला आहे.
Next
वॉशिंग्टन : अमेरिकेत स्नोजिला या हिमवादळाने कहर केला असून यातील बळींची संख्या २५ वर पोहोचली आहे. रस्त्यांवर आणि ठिकठिकाणी बर्फ साठला आहे.
वॉशिंग्टनमध्ये सरकारी कार्यालये आणि विद्यालये बंद आहेत. या वादळाने अमेरिकेतील १२ राज्यांना तडाखा दिला आहे. आतापर्यंत साडेआठ कोटी नागरिकांना या वादळाचा फटका बसला आहे. सुुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये २६.८ इंच बर्फ साठला आहे. १८६९ नंतरचे हे सर्वात मोठे हिमवादळ आहे. वॉशिंग्टनसह मोठ्या शहरात अनेक ठिकाणी बर्फाची चादर अंथरली गेली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. (वृत्तसंस्था)