‘ती’ नर्स आता तिच्या राज्यातून अन्यत्र जाणार
By admin | Published: November 10, 2014 02:02 AM2014-11-10T02:02:45+5:302014-11-10T02:02:45+5:30
पश्चिम आफ्रिकेत इबोला रुग्णांवर उपचार करताना त्या आजाराची लागण झालेली परिचारिका न्यू जर्सी या तिच्या राज्यातून अन्य ठिकाणी स्थलांतरित होणार आहे.
वॉशिंग्टन : पश्चिम आफ्रिकेत इबोला रुग्णांवर उपचार करताना त्या आजाराची लागण झालेली परिचारिका न्यू जर्सी या तिच्या राज्यातून अन्य ठिकाणी स्थलांतरित होणार आहे. कासी हिकोक्स असे या नर्सचे नाव आहे.
इबोलाची लागण झालेल्या रुग्णाला स्वतंत्र खोलीत ठेवले जाते तसे गेल्या महिन्यात हिकोक्स हिलाही न्यूजर्सी आणि मायने येथे तसे ठेवण्यात आले होते; परंतु ती तेथून बाहेर पडली. तिने न्यूजर्सीतून अन्यत्र जाण्याचे ठरविले आहे, असे वृत्त मायनेतील वृत्तपत्राने दिले आहे. इबोलाच्या विषाणूची बाधा व त्याची प्रत्यक्ष लक्षणे यांच्यावर २१ दिवस लक्ष ठेवण्याची मुदत संपत असल्यामुळे १० नोव्हेंबरनंतर आम्ही मायने सोडून जाणार आहोत, असे तिचा मित्र टेड विलबर याने सांगितले. सिएरा लिओनमध्ये हिकोक्समध्ये इबोलाची कोणतीही लक्षणे दिसत नसताना तिला न्यू जर्सीमध्ये चार दिवस रुग्णालयात वेगळे ठेवण्यात आले होते. न्यू जर्सीचे गव्हर्नर ख्रिस ख्रिस्ती यांच्यावर टीका करून मायनेतील फोर्ट केंटमध्ये मित्राच्या घरी आली.