बेरोजगार नाही होणार ओबामा, मिळाली जॉबची ऑफर !
By admin | Published: January 10, 2017 09:38 PM2017-01-10T21:38:25+5:302017-01-10T23:31:05+5:30
अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती बराक ओबामा यांचा कार्यकाळ दोन आठवड्यांमध्ये संपणार आहे. काही दिवसांपूर्वी ओबामांनी
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 10 - अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती बराक ओबामा यांचा कार्यकाळ दोन आठवड्यांमध्ये संपणार आहे. काही दिवसांपूर्वी ओबामांनी 'स्पोटिफाय'मधून नोकरीचा प्रस्ताव येण्याची वाट पाहात आहे असं गंमतीत म्हटलं होतं.
ओबामांच्या विधानाला प्रतिसाद देत स्पोटिफाय या जगातील सर्वात मोठ्या म्यूझिक स्ट्रीमिंग सेवा देणा-या कंपनीने ओबामा यांना नोकरीचा प्रस्ताव दिला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचा किमान 8 वर्ष अनुभव असलेल्या व्यक्तिची आम्हाला 'प्रेसिडेंट ऑफ प्लेलिस्ट' या पदासाठी आवश्यकता आहे. उमेदवाराला प्रसिद्ध कलाकारांविषयी माहिती आणि तो उत्तम वक्ता असणं गरजेचं आहे. अशी जाहिरात स्पोटिफायने काढली आहे. सीएनबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे.
याशिवाय, ज्याने शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकला असेल अशा उमेदवाराची आम्हाला आवश्यकता आहे असं ट्विट स्पोटिफायचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल यांनी केलं. 2009 मध्ये ओबामांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
या प्रस्तावावर ओबामा काय बोलतात हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे, अर्थात याकडे गंमतीचा भाग म्हणून पाहिलं जात आहे.